Sanjay Shirsat  Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मराठा समाजाची दिवाळी गोड होणार?; सत्ताधारी आमदाराचे महत्त्वपूर्ण विधान

Vijaykumar Dudhale

Mumbai News : मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे एक महत्त्वपूर्ण विधान पुढे आले आहे. मराठा समाजासाठी ते दिलासा देणारे आहे. मराठा समाजाची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि तो मनापासूनचा आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. (Maratha Reservation : Will Maratha community's Diwali be sweet? : Sanjay Shirsat)

मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारचा घटनाक्रम पाहिला तर त्यात कुठेही नकारात्मक दृष्टिकोन नाही. काय करता येईल, याबाबत सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली. त्या बैठकीत सत्ताधारी, विरोधी आणि इतर पक्षाच्या नेत्यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण देताना कायदेशीर चौकटीत बसवून दिलं पाहिजे, असे सर्वांचे म्हणणे होते. दिलेले आरक्षण कोर्टात टिकलं नाही असं होऊ नये, अशी सर्वच पक्षांची प्रामाणिक भूमिका आहे. त्या भूमिकेचा मान ठेवला पाहिजे, असेही शिरसाट यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांबाबत आमदार शिरसाट यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. सरकारचे शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहे. कालही बैठक झाली आहे. सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सरकारची आहे. दिलेले आरक्षण टिकेल कसे, अडचणी पुन्हा येऊ नयेत, अशी सरकारची भूमिका आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकार टाळत आहे, विलंब करतंय, असे कोणाच्याही मनात येण्याचे कारण नाही; पण या आंदोलनाचा काही समाजकंटक फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून चुकीचा संदेश जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तुम्ही उपोषण मागे घ्या, आरक्षण देण्याचा शब्द मी देतो, असेही म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द ते मागे घेणार नाहीत. शब्दासाठी वाटेल तो त्याग करण्याची भूमिका असते. त्यामुळे सहकार्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घ्यावी, असे आवाहन आमदार शिरसाट यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT