Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News : ओबीसी कोट्याला धक्का न लावता 'मराठा आरक्षण' देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही..

Eknath Shinde on Maratha Reservation : ओबीसी नेत्यांचा कडाडून विरोध...

उत्तम कुटे

Mumbai News : मराठा आरक्षण आंदोलन आता तीव्र झाले आहे. ओबीसी प्रवर्गातून किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवून कोणत्याही मार्गाने आरक्षण द्या, अशी आरपारची मागणी मराठा समाजाने केल्याने आता राज्य सरकारची अडचण झाली आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला, असे झाले तर राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, अशी सावध भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली आहे. (Latest Marathi News)

ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असेच प्रयत्न सुरु असल्याने, यात कुणीही दोन्ही समाजातील बांधवांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नावरही भर देणार असल्याचे त्यांनी काल (ता.६) रात्री उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. पण काही मंडळी दिशाभूल करून मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही दुर्देवी बाब आहे, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून १२ आणि १३ टक्के आरक्षण दिले होते. ते उच्च न्यायालयातही टिकले होते. त्यामध्ये कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आला नव्हता, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पण, मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यावर योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही आणि दुर्दैवाने ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

"रद्द झालेले हे आरक्षण पुन्हा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागेल ते करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर मराठा समाज हा सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र आयोग आणि तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करेल. यातून मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण निश्चितच परत मिळेल. मराठा समाजाला इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आरक्षण दिले जाईल," असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT