Maharashtra Political News : मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, म्हणून मराठा समाजातील पदाधिकारी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर गेले होते.
मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यानं पदाधिकारी नाराज झाले. त्यानंतर मराठा समाज उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. मराठा समाज 'मातोश्री' निवासस्थानावर मोर्चा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडावी म्हणून मराठा समाजातील काही पदाधिकारी सोमवारी 'मातोश्री' या निवासस्थानी गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांना भेट दिली नाही. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
त्यानंतर आज मराठा समाज उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थावर मोर्चा काढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खेरवाडी पोलिस ठाण्याकडून 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर बॅरिगेट लावण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून खेरवाडी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं दिसत आहे.
"तुमची लायकी दाखवू देऊ"
भेट नाकारण्यात आल्यानंतर मराठा समाजातील एका पदाधिकाऱ्यानं उद्धव ठाकरेंविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. "मराठ्यांच्या आंदोलनाचा फायदा विरोधकांना झाला आहे. यांचे बंद पडणारे पक्ष आमच्या आंदोलनामुळे चालू झाले आहेत. पण, मराठ्यांना नजरअंदाज केलं, तरी आम्हालाच मतदान मिळेल, असा यांना भ्रम झाला आहे. पण, त्या भ्रमात राहू नका. तुम्हाला तुमची लायकी दाखवून देऊ," असा इशारा मराठा समाजातील पदाधिकाऱ्यानं दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.