Shivsena News : "माझी हत्या झाली तरी चालेल, पण...", शिंदे गटाच्या आमदाराची खळबळजनक पोस्ट

Mla Balaji Kinikar : अंबरनाथ येथील शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार बालाजी किणीकर यांनी समाज माध्यमावर टाकलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
balaji kinikar eknath shinde.jpg
balaji kinikar eknath shinde.jpgsarkarnama
Published on
Updated on

शिवसेनेच्या ( शिंदे गट ) अंबरनाथ येथील आमदारानं समाज माध्यमावर केलेल्या पोस्टनं खळबळ उडाली आहे. अंबरनाथ येथील आमदार बालाजी किणीकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यात 'माझी हत्या झाली तरी चालेल, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही,' असं आमदार किणीकर यांनी म्हटलं आहे.

तसेच, काही समाजकंटक पक्षाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काम करत आहेत, असंही आमदार किणीकर यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे आमदार किणीकर ( Balaji Kinikar ) यांचा रोख कुणाकडे आहे? हे अद्याप समजू शकले नाही.

किणीकर यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय?

"अंबरनाथमधील काही समाजकंटक पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि अंबरनाथमध्ये होत असलेल्या विकासकामांच्या विरोधात काम करत आहेत. पण, माझी हत्या झाली तरी चालेल, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही. अंबरनाथ शहराचा विकास कधीच थांबू देणार नाही," असं आमदार किणीकर म्हणाले आहेत.

मात्र, आमदार किणीकरांचा स्व:पक्षातील कोणत्या नेत्याकडे आहे? अंबरनाथमधील विकासकामांना कोण विरोध करत आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे आमदार किणीकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

balaji kinikar eknath shinde.jpg
Arjun Khotkar News : ...अन् खोतकरांनी जास्त गॅस सिलिंडरसाठी कशी चालाखी करायची हे भर कार्यक्रमात महिलावर्गाला सांगितलं!

दरम्यान, आमदार किणीकर यांनी सोमवारी ( 29 जुलै ) अंबरनाथ नगरपरिषद अंतर्गत शहरात होत असलेल्या रस्ते, कचरा, सांडपाणी, शासकीय महाविद्यालय, घरपट्टी, सफाई कर्मचारी वाढवणे, पथदिवे अशा विविध प्रश्नांसदर्भात मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी 15 दिवसांत समस्या सोडविल्या नाही तर जन आंदोलन करण्याचा इशारा आमदार किणीकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

balaji kinikar eknath shinde.jpg
Aditya Thackeray News : नोव्हेंबरमध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल; त्यानंतर... आदित्य ठाकरेंचा महायुतीला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com