Kiran Mane In Shiv Sena : Sarkarnama
मुंबई

Kiran Mane In Shiv Sena : ...अखेर किरण मानेंच्या हाती शिवबंधन; 'परिवर्तनाच्या चळवळीला बळ...'

Kiran Mane In Shiv Sena : "परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो..."

Chetan Zadpe

Mumbai News : बिग बॉस फेम आणि 'मुलगी झाली हो' या मराठी टीव्ही मालिकेतून चर्चेत आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) आता आपल्या राजकीय इनिंगची सुरूवात केली आहे. किरण माने यांचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला. अभिनयासोबतच आता किरण माने रातकीय इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Latest Marathi News)

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानतर किरण माने म्हणतात, "शिव'बंधन आधीपासून मनाशी घट्ट बांधलेलंच होतं. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं, ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीतल्या शिलेदारानं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो, जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र."

कोण आहेत किरण माने?

मराठी मालिकेमधील एक ओळखीचा चेहरा आणि मराठी बिग बॉस फेम किरण माने आज यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. किरण माने हे नाव त्यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या विधानामुळे चर्चेत असतात. राजकीय पोस्ट आणि सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टिकेमुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत.

एका मराठी वाहिनीच्या मालिकेतून त्यांना सत्ताविरोधी भूमिका घेतल्यामुळे काढण्यात आलं, असा त्यांनी आरोप केला. मालिकेतून देखील अचानक पणे काढण्यात आलं. यामुळे किरण माने हे चर्चेत राहिले आहेत. मराठी बिग बॉस मध्ये सहभागी होऊन त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील त्यांनी या शोच्या माध्यमातून सांगितलं. किरण माने यांची ही लढाई कोर्टात सुरु आहे.

किरण माने हे एका वाहिनीवर 'मुलगी झाली हो' या मालिकेत भूमिका करत होते. त्यांना 2022 मध्ये मालिकेतून काढून टाकण्यात आले. सोशल मीडियावरील पोस्टमधून भाजपविरोधात भूमिका घेतल्याने मालिकेतून काढल्याचा आरोप मानेनी त्यावेळी केला होता. हा वाद बराच गाजला होता. त्यानंतर ते सोशल मीडियातून सातत्याने भूमिका मांडत आहे. आता राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT