किरण माने यांच्या पत्नीची महिला आयोगात धाव

किरण माने यांच्या पत्नी ललिता किरण माने (Lalita Kiran Mane) यांनी आता राज्य महिला आयोगाकडे धाव घेत पतीवर झालेल्या अन्यायाची दाद मागितली आहे.
Kiran Mane
Kiran ManeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' फेम अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांना अचानक कार्यक्रमातून काढून टाकण्यात आले. हे प्रकरण सध्या मनोरंजन विश्वापासून राजकीय वर्तुळापर्यंत चांगलेच चर्चेत आले आहे. अशातच किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांच्या पत्नी ललिता किरण माने (Lalita Kiran Mane) यांनी आता राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra State Commission for Women) धाव घेत पतीवर झालेल्या अन्यायाची दाद मागितली आहे. (Kiran Mane latest news Update)

महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत मालिकेच्या निर्मात्यांना याबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत महिला आयोगाने एक पत्रकही जाहिर केलं आहे. ''किरण माने हे 'मुलगी झाली हो' या मालिकेत गेल्या काही महिन्यांपासून अभिनय करत आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. किरण माने हे अभिनेते, पुरोगामी विचारवंत आणि लेखकही आहेत. ते विविध माध्यमातून त्यांच्या वैचारिक भूमिका मांडत असतात. त्यामुळेच त्यांना कोणतीही पूर्व संधी वा सूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले.

Kiran Mane
किरण मानेचे बोलवते धनी कोण? चित्रा वाघ संतप्त, सोंगाड्याला शिक्षा झालीचं पाहिजे

निर्मात्यांच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे. कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्याचे सांगत, राज्य महिला आयोगाने याबाबतीतचा लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना दिले आहेत.

दरम्यान, मालिकेतील काही सहकलाकारांनी किरण माने यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रार कऱणाऱ्या सहकलाकरांनी केलेले आरोप फेटाळून लावत किरण माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "‘ज्या महिलांनी पुढे येऊन माझ्या विरोधात तक्रार केली. त्यांनी जे गैरवर्तनाचे मुद्दे सांगितले ते इयत्ता पाचवी ड च्या वर्गातील होते. प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू झाला आणि अनेक कलाकारांना माझ्या विरोधात बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे’,असे किरण माने यांनी म्हटले आहे. यासंदर्भात किरण माने यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे.

‘आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती हे भाजपचे पदाधिकारी,' असल्याचा दावा देखील किरण माने यांनी केला आहे. ‘माझ्यावर करण्यात आलेले गैरवर्तनाचे आरोप हे माझ्या विरोधातील षडयंत्र’, असल्याचा आरोप किरण माने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप त्यांनी केला. चॅनेलकडून देखील त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले मात्र किरण माने संदर्भात सुरू झालेला वादला आता नवीन वळण लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com