Sanjay Raut On Marathwada Flood Crisis sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'पैशाचं सोंग आणता येत नाही...' अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप; म्हणाले 'सरकार चालवू नका, तुमच्या दरोडेखोरीमुळेच...'

Sanjay Raut On Marathwada Flood Crisis : 'राज्यावर 9 ते 10 लाख कोटी रूपयांचे कर्ज असल्यामुळे त्यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. हे लोक 65 हजार कोटी रूपये व्याज भरतात.

Jagdish Patil

Mumbai News, 25 Sep : मुसळधार पाऊसामुळे मराठवाड्यात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचं अतिवृ्ष्टीने नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी टाहो फोडला आहे.

त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसह विरोध पक्षाकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. अशातच बीड दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना एका व्यक्तीने कर्जमाफी करा, असं म्हणताच, 'पैशांचं सोंग आणता येत नाही, आम्हाला कळतंय ना, आम्ही गोट्या खेळायला आलोय का?' असं संतप्त उत्तर दिलं होतं.

त्यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. पैशाचं सोंग आणता येत नसेल तर मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली? त्यांच्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आली आहे. तुम्ही सारखं लाडक्या बहिणांची उल्लेख करू नका लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, 'महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणण्याची वेळी ही त्यांच्या दरोडेखोरीमुळेच आलेली आहे. 9 ते 10 लाख कोटी रूपयांचे कर्ज या राज्यावर असल्यामुळे त्यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही.

हे लोक 65 हजार कोटी रूपये व्याज भरतात. मराठवाड्यातील संकटातून कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. शेतकऱ्यांनी कसं जगायचं?', असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

शिवाय दौऱ्यावर गेलेल्या सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश ऐकून कधी घेतला? 36 लाख शेतकरी उध्वस्त झालेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं? असा सवाल राऊतांनी केला. तर पाण्याच्या बॉटल वर फोटो लावून मदत होत नाही, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT