Sharad Pawar : 'केंद्राच्या सहकार्याने भरवलेल्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये गोळवलकर गुरुजींचे साहित्य, पण आंबेडकरवादी...,' शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Sharad Pawar on Book Exhibitions : 'देशापुढील आव्हाने हळूहळू गंभीर होत आहेत. अनेक विचारांचे भुमिकांचे लोक संसदेत आहेत. कधीकधी चिंता वाटावी असे चित्र दिसते. निर्णय घेण्याचे व्यासपीठ बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. मात्र, संविधानाच्या चौकटीबाहेर जाता येत नसल्याने अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो.'
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 Sep : केंद्र सरकारच्या सहकार्याने पुण्यात भरवल्या जाणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीची, गोळवलकर गुरुजी यांचे साहित्य प्राधान्याने दिसते. मात्र, आंबेडकरवादी साहित्याला त्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये स्थान नसते, ही खेदाची गोष्ट आहे.

असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात बोलत होते. माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाचा पाया भक्कम असल्यामुळेच आपल्याला भूमिका मांडण्याचा अधिकार असून संविधानामुळेच भारत एकसंध असल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या सहकार्याने भरवल्या जाणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी आणि गोळवलकर गुरुजींचे साहित्य दिसते.

Sharad Pawar
Shivsena UBT : 'काँग्रेसवर खापर फोडणे हाच मोदींचा उद्योग; इतका अपयशी पंतप्रधान जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसेल, तरीही छंदी-धुंदी लोक...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

मात्र, आंबेडकरवादी किंवा समतावादी चळवळीतल्या साहित्याला तिथे स्थान नसते ही खेदाची गोष्ट आहे. ते म्हणाले, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक संशोधन केंद्राचे उद्घाटन होतंय, ही सकारात्मक गोष्ट असून संविधानामुळेच भारत एकसंध आहे.

Sharad Pawar
Kirankumar Bakale : मराठा महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा पीआय किरणकुमार बकालेला मोठा झटका; आयुष्यभर अंगावर खाकी चढवता येणार नाही!

देशापुढील आव्हाने गंभीर होत आहेत. अनेक विचारांचे भुमिकांचे लोक संसदेत आहेत. कधीकधी चिंता वाटावी असे चित्र दिसते. निर्णय घेण्याचे व्यासपीठ बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. मात्र, संविधानाच्या चौकटीबाहेर जाता येत नसल्याने अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो. संविधान हे देशातील प्रत्येक समस्येचं उत्तर आहे.'

तसंच यावेळी त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण असल्याचा दाखला देत भारत एकसंध व प्रगतीच्या पथावर असण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान व त्यातील लोकशाही मूल्यांचं महत्वाचं योगदान असल्याचंही म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com