Mumbai, 08 December : ‘ईव्हीएम’च्या विरोधात आवाज उठविणारे मारकवाडीवरून राज्याच्या राजकारणात रणकंदन माजले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडीत भेट देऊन ‘ईव्हीएम’विरोधातील लढाई पुढे घेऊन जाण्याची घोषणा केली. शरद पवारांच्या दौऱ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. गेली तीन निवडणुकीतील आकडेवारी जाहीर करत मारकडवाडी कुणा एकाची मक्तेदारी नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शरद पवारसाहेब, मारकडवाडी ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली आहे. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ मधील मतांची आकडेवारी देत आहे, जरा डोळे उघडून नीट वाचा.
लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली होती, तर महायुतीचे घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. तसेच २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (NCP) हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली होती, तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली होती, असेही बानकुळेंनी नमूद केले आहे.
ते म्हणाले, पुढील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली होती. मात्र, त्याच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तम जानकरांना (Uttam Jankar) १३४६ मतं मिळाली, तर भाजपचे तेव्हाचे उमेदवार राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली होती.
लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१, तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली होती. विधानसभेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर यांना ८४३, तर भाजपचे राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या विविध आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली आहे, त्यामुळे मारकडवाडी हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही.
यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.