Medha Somaiyya Sarkarnama
मुंबई

Medha Somaiyya in Court : सुनावणीत मेधा सोमय्यांची अजब मागणी; मग न्यायालयानेही दिलं थेट उत्तर

Sanjay Raut News : राऊतांवरील मानहानीच्या खटल्यात सोमय्यांची उलटतपासणी

सरकारनामा ब्युरो

Medha Somaiyya and Court : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटीं रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आपल्यावरील आरोप निराधार आणि अवमानकारक असल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी राऊतांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची आज शिवडी न्यायायालयात सुनावणी होती. ही सुनावणी सुरू असताना सोमय्या यांनी एक अजब मागणी केली. त्यावर न्यायालयानेही थेट उत्तर दिले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मेधा सोमय्या यांच्यावर मीरा-भाईंदर परिसरात शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात राऊतांवरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या प्रकरणाची आज सुनावणी होती. त्यावेळी सोमय्या आणि राऊत एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी राऊत यांनी सोमय्यांना नमस्कार करून त्यांची विचारपूस केली. आज संजय राऊत यांचे वकील मनोज पिंगळे यांनी कोर्टाला लेखी उत्तर सादर केले. तर मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी सामना वर्तमानपत्राची प्रत न्यायालयासमोर सादर केली.

दरम्यान, या प्रकरणी आज न्यायालयात मेधा सोमय्या (Medha Somaiyya) यांची उलटतपासणी सुरू होती. त्यावेळी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे एक अजबच मागणी केली. न्यायालयात खासदार राऊत यांचे वकील मेधा सोमय्यांना प्रश्न विचारत होते. त्यावेळी सोमय्यांनी न्यायालयाकडे एक मागणी केली.

त्या न्यायालयाला उद्देशून म्हणाल्या की, "मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का?" त्यावर न्यायालयानेही तत्काळ थेट उत्तर दिले. न्यायमूर्ती मोकाशी म्हणाले, येथे ऑफ द रेकॉर्ड असं काही नसतं." त्यावर सोमय्या यांनी त्यांची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "मला या वकिलांना (संजय राऊत यांच्या) जरा नीट समजावून सांगू द्या, म्हणजे ते प्रश्न नीट विचारतील." या प्रकाराची चर्चा मात्र न्यायालयात चांगलीच रंगल्याचे दिसून आली.

काय आहे प्रकरण ?

मीरा-भाईंदर परिसरात १५४ शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातील १६ शौचालयाचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. त्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिकेची फसवणूक केली. तसेच शौचालयाचा एकूण १०० कोटींचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केल्याचे आरोप खासदार राऊत यांनी केले आहेत. त्यावर सोमय्या यांनी राऊतांवर १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT