Dilip Dhole Sarkarnama
मुंबई

Mira Bhayandar Commissioner: मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय 'मीरा भाईंदर'चे आयुक्त ढोलेंची तडकाफडकी बदली ; काटकर नवे आयुक्त

Sanjay Katkar New Commissioner: सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी पदभार स्वीकारला.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर (Sanjay Katkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी दोन दिवसापूर्वी दिलीप ढोले यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर ढोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी काटकर यांनी काल (बुधवारी) पदभार स्वीकारला.

दिलीप ढोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

युएलसी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाकडून (ईडी) दिलीप ढोले यांना समन्स बजावण्यात आले होते. मार्च 2021 मध्ये मीरा भाईंदर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून ढोले यांनी पदभार स्वीकारला होता. एक वर्षापूर्वी, ते अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाणे महानगरापालिकेत रुजू झाले होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT