मुंबई : विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. विधानसभेतील लक्षवेधीत आज रईस शेख यांनी भिवंडीतील मेट्रो प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाणे, भिवंडी परिसरातून जाणारी मेट्रो रेल्वे ही काही ठिकाणी भुयारी करण्यात येणार असल्याने 735 घरे वाचणार असल्याचे सांगितले. तसेच हा प्रकल्प कधी व केव्हा सुरू होणार यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ( Metro project will be underground: 735 houses in Thane, Bhiwandi area will be saved )
भिवंडीत दोन वर्षांपासून मेट्रो प्रकल्प सुरू होऊनही या कामाचा विकास आराखडाही तयार नाही. या प्रकल्पापर्यंत प्रवाशांना जाण्यासाठी बससेवाही नसल्याबाबत रईस शेख यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी हा मेट्रो प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाच्या भुसंपादनाबाबत अनेकवेळा आंदोलने झाली. त्यामुळे या प्रकल्पामुळे कमी घरे बाधित होतील याची काळजी राज्य सरकार घेत आहे. (Metro project News)
मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून भूसंपादन कमी व्हावे यासाठी मेट्रो रेल्वे जमिनी खालून नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रकल्पावरील रोष कमी होईल. या कामासाठी 1400 कोटी रुपये अतिरिक्त खर्च लागणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भिवंडीत मल्टीनॅशनल गोडाऊन आहेत. तेथे अनेक कामगार काम करतात. या लोकांना मेट्रो प्रकल्पापर्यंत पोचण्यासाठी कल्याण-भिवंडी, मिरा-भाईंदर व ठाणे महापालिकेशी बैठक घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आगामी चार महिन्यांत या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुसंपादित होणारी निवासी घरांसाठी पैसे तर व्यावसायिक अस्थापनांना 225 चौरस फुटांचे गाळे देऊ, मंत्री शिंदे यांनी सांगितले.
शासकीय जमिनींचे भूसंपादन का नाही?
शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडत आग्री असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादित करण्याऐवजी राईमुरदा गावाजवळील शासकीय जमिनींचे भूसंपादन का केले जात नाही. एमएमआरडीएने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यात शेतजमिनीतून प्रकल्प नेण्यात आला आहे. या जमिनी जवळच शासकीय जमिनीही आहेत. आग्री बांधवांनी या पूर्वी अनेकवेळा जमिनी रस्त्यांसाठी दिल्या आहेत. दरवेळी भूमिपूत्रांवर अन्याय का असा प्रश्नही प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.