Milind Deora sarkarnama
मुंबई

Shiv Sena News : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच ठाकरेंनी विचारधारा बदलली; देवरांचा घणाघात

Milind Deora on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आता शिवसेना खासदाराने (शिंदे गट) टीका केली आहे...

Pankaj Rodekar

Eknath Shinde Shiv Sena MP News :

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच त्यांनी आपली विचारधारा बदलली. याला खऱ्या अर्थाने संधीसाधूपणा म्हणतात, अशी टीका Shiv sena शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केली. ठाण्यातील रेमंड मैदान येथे आयोजित केलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली नाही, असाही टोला देवरा यांनी लगावला.

तरुण वर्ग म्हणजे देशाचे भविष्य आहे. तरुण वर्गाकडे खूप वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे व्हिजन हवे ते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे, असेही ते म्हणाले. तसेच एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री, असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाचे सोशल मीडिया माध्यम वाढविण्यासाठी तरुण वर्गाने यात हिरिरीने सहभाग घ्यायला हवा. राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण यांनी नाकारले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आस्थेला नाकारले. तर 20 वर्षांपूर्वी मी काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. पण ते आले नाहीत. त्यांना हिंदू विचारधारा आवडत नाहीत. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील हिंदू सणांना, रूढी व परंपरेला प्रोत्साहन दिले, असे मिलिंद देवरा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT