Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!

Eknath Shinde welcomed by Tutari : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह दिल्यापासून तुतारी चर्चेत आली आहे.
...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!
...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!sarkarnama
Published on
Updated on

Thane Political News : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी तुतारी ठेवण्यात आली होती. त्यानंतर एकदा नव्हे तर दोनदा एकाच कार्यक्रमाच्या ठिकाणी "तुतारी" वाजवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निशाणी म्हणून "तुतारी" दिली आहे. त्यानंतर तुतारी पुन्हा एकदा चर्चेत आली असताना, अशाप्रकारे तुतारी वाजवून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले, "महाराष्ट्राची स्थिती बदलून..."

कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत 5 हजार 311 सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत शनिवारी ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनात काढण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते, तर दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार म्हणून कार्यक्रमास्थळी पाहुण्याच्या स्वागतासाठी तुतारी ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यावर तुतारी वाजविण्यात आली. तसेच रंगायतनाच्या मंचावर मुख्यमंत्री येतातच पुन्हा एकदा तुतारी वाजवून त्यांचे स्वागत केले गेले.

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे. त्यानंतर शुक्रवारी त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात तुतारी वाजवून जल्लोष केला होता. शनिवारी शासकीय कार्यक्रमात तुतारी वाजविण्यात आल्याने यापुढे प्रत्येक राजकीय आणि शासकीय कार्यक्रमात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह असलेली तुतारीच दिसणार, असे राजकीय तज्ज्ञ मंडळींकडून बोलले जात आहे.

...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!
Eknath Shinde News : मराठा समाजाला आरक्षण दिल्याने संयम राखावा; एकनाथ शिंदेंनी केले आवाहन

आपले हक्काचे स्वमालकीचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यातील काही भाग्यवंतांचे स्वप्न आज या सोडतीद्वारे पूर्ण झाले आहे, याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्य लोकांना म्हाडाची घरे वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात मिळावीत, यासाठी शासन कटिबद्ध आहे. ही घरे बांधताना कामांची गुणवत्ता राखली गेली पाहिजे, म्हाडाची पॉलिसीदेखील सुलभ आणि सुटसुटीत असायला हवी. यावर्षीच्या सोडतीमध्ये ज्यांना घरे मिळाली त्यांचे अभिनंदन केले, तसेच आगामी वर्षात याहून जास्त घरे नागरिकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

...अन् मुख्यमंत्री शिंदेंचे 'या' कार्यक्रमात 'तुतारी' वाजवून झाले स्वागत!
Mhada Lottery : म्हाडाचं घर लागूनही परत करावं लागलं; गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितला आपला अनुभव

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह दिलं होतं. या चिन्हाचं रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी शनिवारी ( 24 फेब्रुवारी ) अनावरण केलं. चिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार रायगडावर पालखीच्या माध्यमातून पोहोचले. या वेळी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com