Milind Deora :  Sarkarnama
मुंबई

Milind Deora In Shivsena : मी विकासाच्या मार्गावर जात आहे; काँग्रेसचा राजीनाम्यानंतर देवरांचा सूचक...

Chetan Zadpe

Mumbai News : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी विकासाच्या मार्गावर जात आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी ही लढाई पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीतून या जागेचे दावेदार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत, यामुळे देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली होती. यामुळे आता देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचे निश्चित आहे.

मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 विद्यमान पदाधिका-यांसह माजी खासदार मिलिंद देवरा यांचा आजच शिंदे गटात प्रवेशाची होणार आहे. देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT