Konkan Political News : अलीकडेच राष्ट्रवादीच्या रत्नागिरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी राजीनामा देऊन शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. एकाच वेळी तब्बल पंधरा पदाधिकाऱ्यांनी तातडीने राजीनामे दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी महिला शहर अध्यक्ष नेहाली नागवेकर यांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान हे 15 पदाधिकारी सुदेश मयेकरांच्या पाठोपाठ पालकमंत्री उदय सामंतांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रावादीच्या 15 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राजीनामे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व निरीक्षक शेखर माने यांच्याकडे पाठवले आहेत. सुदेश मयेकर पक्षात नसल्याने आम्ही राजीनामा देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मयेकर हे आमच्यासाठी गॉड फादर होते. त्यांचे आता नेतृत्व नसल्याने राजीनामा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाही आम्हाला कसलाही निधी मिळालेला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामा
1) सिध्देश शिवलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष रत्नागिरी
2) कैस मालगुंडकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी
3) शरद कापसे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य रत्नागिरी
4) नेहाली नागवेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर अध्यक्ष रत्नागिरी
5) राजेश भाटकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष रत्नागिरी
6) संतोष सावंत
राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष रत्नागिरी
7) संजय नैकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पावस पंचायत समितीगण अध्यक्ष रत्नागिरी,
8) वैभव नैकर
राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी युवक तालुका उपाध्यक्ष
9) संजना जोशी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर उपाध्यक्ष रत्नागिरी
10) लिलाधर नागवेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी शहर उपाध्यक्ष रत्नागिरी
11) मनिष गुरव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी पावस विभाग अध्यक्ष रत्नागिरी
12) ओंकार शेट्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र. 8 अध्यक्ष रत्नागिरी
13) वाहिद फकीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष रत्नागिरी
14) राजेश मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाफे बूथ कमिटी अध्यक्ष रत्नागिरी
15) तन्वीर सोलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजिवडा प्रभाग क्र. 7 अध्यक्ष रत्नागिरी
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सर्वांनी आपले राजीनामे राष्ट्रवादीचे (NCP) निरिक्षक शेखर माने यांच्याकडे पाठवले आहेत. हे सर्व पदाधिकारी हे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या विचाराचे समर्थन करणारे होते. आमचे नेतृत्वच आता आपल्यासोबत नाही तर आम्ही येथे त्या पक्षात राहून काय करणार? असा प्रश्न उपस्थित त्यांनी मयेकरांची साथ देणार असल्याचे ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष सिध्देश शिवलकरांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.