Worli Assembly Constituency Politics News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष कंबर कसून प्रचारात उतरले आहेत. विरोधी पक्षावर जोरदार आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी रणनीती देखील आखल्या जात आहेत. यामध्ये मग फोडाफोडीच्या राजकारणालाही उधाण आलं आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जात आहेत. तर काही ठिकाणी बंडखोरांचेही राजकीय पक्षांसमोर आव्हान कायम आहे.
अशा सगळ्या घडामोडींत आता एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे वरळीमधील उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली आहे. 'ठाकरे गटाला पराभव समोर दिसतोय म्हणून त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं आहे. उद्यापासून कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचा आरोप लावू नका, उबाठा मोठ्या मताधिक्याने पराभूत होतील.' असं देवरा म्हणाले आहेत.
याशिवाय, 'वरळीत फोडाफोडीचं आणि खोक्याचं राजकारण सुरु झालं आहे. पराभव समोर दिसताना आज UBTनी आमचा पक्ष फोडला. २०१९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष फोडले, काँग्रेस(Congress) पक्षाचे कार्यकर्ते फोडले आणि आज त्यांनी शिवसेनाही फोडली. उद्यापासून कोणत्याही पक्षावर फोडाफोडीचा आरोप लावू नका.' असं देवरा म्हणत आहेत.
तसेच, 'फोडाफोडी करण्याऐवजी जर वरळीचा विकास केला असता तर आज ही वेळ आली नसती. अशा राजकारणाचा परिणाम निवडणुकीत नक्कीच होईल आणि UBT मोठ्या मताधिक्याने पराभूत होतील, अशा शब्दांमध्ये मिलिंद देवरा(Milind Deora) यांनी टीका केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे. कारण, या ठिकाणच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखा प्रमुख श्रीकांत जावळे, संतोष शिंदे व नेते अन्वर दुर्रानी या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावरूनच मिलिंद देवरा यांनी संताप व्यक्त केला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.