Milind Narvekar : उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. बाबरी मशिद पाडल्याचा एक फोटो त्यांनी पोस्ट करत त्यावर ' हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे' अशी कॅप्शन लिहीली आहे. तसेच या फोटोवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांचाही फोटो शेअर केला आहे. पण त्यांच्या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज तीस वर्षे पुर्ण झाली. बास्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं होतं. जे बरंच चर्चेतही राहिलं. 'हिंदूंची साडेतीन हजार देवळं पाडून त्यावर मशिदी बांधण्यात आल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिद द्या. बाबरी जी पडली. आता आम्हाला काशी आणि मथुरा येथील दोन पाडायच्या आहेत . बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
आजच्याच दिवशी 29 वर्षांपूर्वी 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत लाखो कारसेवकांनी बाबरी मशिदीचा वादग्रस्त वास्तू पाडला होता. अयोध्येतील बाबरी मशिदीचा वाद वर्षानुवर्षे सुरू होता. भाजप नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी चळवळ सुरू केली होती.
५ डिसेंबर १९९२ च्या सकाळपासून अयोध्येतील वादग्रस्त इमारतीजवळ कारसेवक येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केवळ भजन-कीर्तनाला परवानगी दिली होती, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ६ डिसेंबर रोजी जमावाने बेमुदत बाबरी मशिदीचा वादग्रस्त वास्तू पाडला. त्यावेळी दीड लाखांहून अधिक कारसेवकांनी बाबरी मशिद पाडल्याचेही बोलले जाते.
या घटनेनंतर मुंबईसह, देशभरात जातीय दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये २ हजारांहून अधिक लोक मारले गेले. या प्रकरणी 49 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींमध्ये लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, चंपत राय, कमलेश त्रिपाठी या भाजप आणि विहिंप नेत्यांचा समावेश होता. 28 वर्षे न्यायालयात खटला चालला आणि 30 सप्टेंबर 2021 रोजी लखनौ येथील सीबीआय न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल येईपर्यंत 49 पैकी केवळ 32 आरोपी उरले होते, उर्वरित 17 आरोपी मरण पावले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.