NCP; भाजपला रस्त्यावर फिरू देणार नाही

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि आमदार प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
NCP agitation in Dhule
NCP agitation in DhuleSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे (BJP) खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (NCP) सोमवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्यांत छत्रपती शिवाजी महाराजांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. ते थांबवा अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. (NCP leaders warn BJP on there leader`s abusive language)

NCP agitation in Dhule
Ajit Pawar : पत्रकार परिषदेत अजितदादांच्या मनातलं ओठावर आलं; उद्धव ठाकरेंना म्हणाले...

गेले काही दिवस भाजपच्या विविध नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक उल्लेख केले जात आहेत. भाजपचे काही नेते असे वक्तव्य करतात. अन्य नेते त्याचे समर्थन करू सारवासारव करतात. त्यातून राजकीय गोंधळाचे वातावरण निर्माण केले जाते. भाजपचा हा कुटील डाव आहे, असा आरोप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

NCP agitation in Dhule
Udayanraje Bhosale : माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना मोठं होता येत नाही; उदयनराजेंचा इशारा कुणाकडे

राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले. रावसाहेब दानवे व प्रसाद लाड यांच्या पुतळ्याला जोडे मारून गळफास देण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जळगाव महानगराध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिंकू चौधरी, राजूभाऊ मोरे, मझरभाई पठाण, इब्राहिम तडवी, रमेश बहारे, रहीम तडवी, भगवान सोनवणे, रफिक पटेल, कुंदन सूर्यवंशी, अशोक सोनवणे, विशाल देशमुख, अनिरुद्ध जाधव, दुर्गश पाटील, ललित नारखेडे, खलील शेख, नईम खाटीक, प्रवीण सुरवाडे, संजय जाधव, उमेश सूर्यवंशी, जुबेरभाई शेख, सचिन साळुंखे, हितेश जावळे, योगेश साळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com