Dilip Walse Patil | Sharad Pawar  sarkarnama
मुंबई

Dilip Walse Patil: गुरुनं 'गद्दार' म्हटलं, शिष्य गहिवरला; पवारांवर बोलताना वळसे पाटील भावूक

Dilip Walse Patil On Sharad Pawar: शरद पवारांनी असं म्हटल्यानं माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाल्याचंही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच मी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे जवळचे असल्याने शरद पवारांचा आमच्यावर राग असेल.

Deepak Kulkarni

Ambegaon News : एकनाथ शिंदेंनी आमदार-खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.तेव्हा संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर गद्दारीचा शिक्का लावत जोरदार हल्ले चढवले. मात्र, अजित पवारांसह दिग्गज नेतेमंडळींसह आमदारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला. पण पवारांनी आत्तापर्यंत बंडखोरांना कधी गद्दारीचा शिक्का लावला नव्हता.

आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवारांनी बंडखोरांना झटका देण्यासाठी आपली राजकीय मुत्सद्देगिरी आणि अनुभवासह संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचमुळे अत्यंत विश्वासू समजल्या जाणार्या दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन पवारांनी त्यांना गद्दार म्हटलं. पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना वळसे पाटील मात्र चांगलेच भावूक झाले.

महायुती सरकारमधील सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेवर भाष्य केलं.ते म्हणाले, शरद पवारांनी कौटुंबिक संबंध नव्हते, असं म्हटल्याने वेदना झाल्या,जर एखादी व्यक्ती चाळीस वर्षे ये-जा करत असेल.तर त्याला कसले संबंध म्हणायचं, हे लोकांनी ठरवायचं आहे, असंही यावेळी वळसे पाटील म्हणालेत.

'पण आपण स्वत: कधीही म्हटलं नाही की,मी शरद पवारांचा मानसपुत्र आहे. लोकं तसं बोलत असत. सार्वजनिक समारंभामध्ये कुटुंबं एकत्र आली, म्हणजे कौटुंबिक संबंध होते असं होतं नाही. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा वहिनी भीमाशंकरला दर्शनाला आल्या की, आमच्या घरी यायच्या, असंही त्यांनी सांगितलं.

वळसे पाटील म्हणाले, ग्रॅज्यूएट झाल्यावर 25 वर्षांचा असताना पवारांचे पी.ए म्हणून काम सुरु केलं होतं. त्यानंतर त्यांच्यामुळेच आमदार म्हणून काम सेचकरण्याची संधी मिळाली. 40 वर्षे घरामध्ये जाणं येणं होतं. पण आता जर शरद पवारसाहेबच म्हणत असतील तर कौटुंबिक संबंध नसतील,असंही बोलताना वळसे पाटील मात्र चांगलेच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

शरद पवारांनी असं म्हटल्यानं माझ्या कुटुंबाला देखील त्रास झाल्याचंही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसेच मी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे जवळचे असल्याने शरद पवारांचा आमच्यावर राग असेल. पुन्हा एकदा आमचे आणि शरद पवार संबंध पूर्वीसारखे होतील का हे साहेबच सांगू शकतील, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केले.

'...तेव्हापासुन पवार आणि आमच्या कुटुंबात येणं सुरु!'

दिलीप वळसे पाटील यांनी जुनी आठवणीचा दाखला यावेळी दिला. ते म्हणाले, शरद पवार आणि माझे वडील एकाच वेळी 1967 ला आमदार झाले. त्यावेळी माझे वडील त्यांच्यामागे पहाडासारखे उभे राहिले असल्याचेही पवार यांनी सांगितलं होतं. तसेच शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर मिसेस पवार,मिसेस शिंदे,आमच्या घरी आल्या. तेव्हापासुन येणं सुरु होतं. माझ्या मुलीचे सुप्रिया सुळेंसोबत कौटुंबिक संबंध नव्हते. राजकीय संबंध होते. यशवंतराव चव्हाण सेंटरला त्या एकत्र काम करत होत्या, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

पवारांना का सोडलं..?

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना का सोडले, याचे उत्तर पूर्वा वळसे पाटील या आपल्या प्रचारसभांमधून देत आहेत. डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा पाडून धरणातील पाणी हे दुसऱ्या तालुक्यात नेण्याचा डाव आहे. तालुक्याच्या हितासाठी वळसे पाटील साहेबांना काळजावर दगड ठेऊन हा निर्णय घ्यावा लागला, असे पूर्वा पाटील या सांगत आहेत.

'गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही...'

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यावेळी शरद पवारांनी निकम यांच्यासाठी घेतलेल्या सभेत ज्यांनी गद्दारी केली,त्यांना शिक्षा द्यायची असते.महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली,त्यांना सुट्टी नाही अशा आक्रमक भाषेत पवारांनी वळसे पाटलांवर टीकेची झोड उठवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT