Mumbai News: महाविकास आघाडीचे सरकार आले अन् मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे चालून आले तर तुम्हाला मुख्यमंत्री होणे आवडेल का? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार? यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत साम टीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाइट' या एक्स्क्लुझिव्ह कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांची मुलाखत झाली.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? सध्याचे राजकारण, मुख्यमंत्रिपद, भाजपसोबत युती आणि शिंदेसेना, व्होट जिहाद, तेजस ठाकरे राजकारणात येणार का? या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
आघाडीचं सरकार आलं तर पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री होणे आवडेल का? की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार? यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यांची आठवण त्यांनी सांगितली.
उद्धव ठाकरे म्हणाले, " फार पूर्वी शिवसेना-भाजपची युती होती तेव्हा हा प्रश्न विचारला असता बाळासाहेब म्हणाले होते की अजून लग्नाचा ना पत्ता, पाळण्याचं काय?.. मुख्यमंत्री कोण होईल हे निवडणुकीनंतर ठरविणार, आम्ही तीनही पक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवू"
महाराष्ट्रद्रोह्यांशी हातमिळवणी करणार नाही, असे सांगत ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपमुळे गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रातील संस्कृती लयाला गेली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी हे सुरु आहे. तुम्ही मते द्या, अथवा नको द्या, त्यांच्यावर धाडी टाकणे, त्यांना पैसे देणे, दमदाटी करुन सत्ता माझीच पाहिजे, हे भाजपचं सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाते की काय अशी परिस्थिती आहे, असे ठाकरे म्हणाले.
उद्योगपती गौतम अदानीमुळे आपले सरकार पडले का? यावर "माझं सरकार पाडलं हा सत्ता जिहादचा प्रकार होता. माझ्या माणसांवर धाडी टाकणे, त्यांचे आयुष्य उदवस्थ करणे, हे सत्ता जिहादच होते. महाराष्ट्रातील सगळे उद्योग गुजरातला नेणे हा महाराष्ट्रावरील सर्वात मोठा दरोडा आहे," असे ठाकरे म्हणाले.
"शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत," असा आरोप त्यांच्यावर होतो. त्याला उध्दव ठाकरे यांनी रोखठोक उत्तर दिले, ठाकरे म्हणाले की ते आमदारांना कसे सांभाळणार ती काय लहान बाळं होती का ? आम्ही त्यांना सत्तेचं दूध पाजलं होते. सत्तेचे दूध पिऊन ते टवटवीत झालीत, मग ढोकळा खायला ते तिकडे पळून गेले,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.