Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्ज रॅकेट चालवणारा ललित पाटील पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलीस ललित पाटीलचा कसून तपास करत आहेत.तसेच पोलिसांनी आरोपी पाटीलच्या गळ्याभोवतीचा फास आवळतानाच त्याच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. पण अद्यापही पोलिसांना ललित पाटीलचा ठावठिकाणा लागलेला नाही.अशातच आता ठाकरे गटाच्या फायरब्रॅँड नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसेंवर गंभीर आरोप केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare)यांनी मंगळवारी मीडियाशी संवाद साधला.त्यांनी ससून रुग्णालयातील ड्रग रॅकेट माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मंत्री शिवसेना नेते दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता,असा आरोप करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
अंधारे म्हणाल्या, दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा.खरी माहिती समोर येईल असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.ससून रुग्णालय प्रशासन ललित पाटील याला दाखल करण्यास नकार दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
" भुसे यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचं धूकं..."
सुषमा अंधारेंनी ससून रुग्णालयातील ड्रग रॅकेटवर थेट भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या,मी आता थेट माहिती घेते.मी नाव घेताना असं सांगतेय.या सगळ्यात दादा भुसे(Dada Bhuse) यांच्या नावाच्या अवतीभोवती संशयाचं धूकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाही? भुसे यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृहखात्याची याप्रकरणाचा खरंच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा असं आव्हान अंधारेंनी दिलं आहे.
मंत्री भुसेंचा पलटवार...
मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या आरोपांवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, नाना पटोले मला ओळखतात.त्यांनी माझं थेट नाव घेतलेलं नाही.सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेऊन थेट आरोप केलाय. (Shivsena )
त्यामुळे याप्रकरणी जगभरातील कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करायची असेल तर करा.आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलीही चौकशी लावा.मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.