Dada Bhuse Vs Sanjay Raut : दादा भुसेंनी वाढवल्या राऊतांच्या अडचणी; 'ते' आरोप भोवले

Nashik Political News : खासदार राऊतांना 23 ऑक्टोबरला मालेगाव येथील कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश...
Dada Bhuse- Sanjay Raut
Dada Bhuse- Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातून विस्तवही जात नाही. एकीकडे शिवसेना पक्ष, चिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेकही सुरू आहे. याचवेळी ठाकरे गटाने बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावला असून, टीकेची धार आणखी तीव्र केली आहे. यात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत शिंदे गटावर टीकेची एकही संधी सोडत नाही, पण आता याच राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी मे महिन्यातील मालेगावच्या जाहीर सभा तसेच 'सामना' या मुखपत्रातून मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याचवेळी त्यांनी मालेगाव दाभाडी येथील गिरणा साखर कारखान्यावर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

Dada Bhuse- Sanjay Raut
Anna Hazare Send Notice To Awhad : जितेंद्र आव्हाडांना अण्णा हजारेंवरील टीका भोवणार ? कायदेशीर नोटीस बजावली

या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. म्हणूनच गंभीर दखल घेतानाच मंत्री भुसे यांनी राऊतांना आरोप सिद्ध करण्याचे खुले चॅलेंज दिले होते. मात्र, आता भुसे यांनी थेट न्यायालयाचे दार ठोठावत संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत खासदार संजय राऊतांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामान्यांमधील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचं (उद्धव बाळासाहबे ठाकरे) मुखपत्र असलेल्या 'सामना' या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. या खटल्यानंतर राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे नेते दादा भुसे(Dada Bhuse) यांनी या अगोदर खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांविषयीचे पुरावे व खुलासे करण्याची मागणी नोटीस बजावत केली होती. मात्र, राऊतांकडून या नोटिसीला कोणतेही प्रत्युत्तर न दिल्याने आता भुसे यांच्यामार्फत हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खासदार राऊतांना 23 ऑक्टोबरला मालेगाव येथील कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे आरोप...?

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे(Adway Hire) यांच्यासह खासदार संजय राऊतांनी ट्विटर, सामना तसेच मालेगाव येथील ठाकरे गटाच्या सभेत गिरणा सहकारी साखर कारखान्यावरून मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधताना भ्रष्टाचाराचा आरोपही केला होता. आता या प्रकरणी दादा भुसे यांनी राऊतांवर पलटवार करतानाच त्यांच्या या आरोपांविरोधात कायदेशीर लढाईचे दंड थोपटले आहेत.

Dada Bhuse- Sanjay Raut
Nana Patole On Dhangekar : काँग्रेसच्या बॅनरवर धंगेकरांचे फोटो का नाहीत? नाना पटोले म्हणाले...

हिरे म्हणाले, गिरणा सहकारी साखर कारखान्याचा लिलाव थांबविण्यासाठी दादा भुसे यांनी गिरणा बचाव समिती स्थापन केली. कारखाना वाचविण्यासाठी निधी उभारण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिष्ठित व्यक्ती, शेतकरी, मजूर हे बळी पडले. त्यातून गिरणा मोसम शुगर अॅग्रो अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावाने हजारो लोकांकडून शेअर्ससाठी पैसे जमा केलेले तब्बल 178 कोटी 25 लाख 50 हजार 10 रुपये या शुगर अॅग्रोचे प्रवर्तक, प्रभारी दादा भुसे यांनी हडपले, असा आरोप त्यांनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Dada Bhuse- Sanjay Raut
Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या विरोधात दमानियांची न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com