पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात माध्यमाद्वारे भाजप (BJP) नेते विविध प्रतिक्रिया देत आहेत. या सर्व प्रकरणावर "चोरोंने हे ललकारा, मिलेगा जबाब करारा" असा इशारा नवाब मलिक यांनी आज (ता.12 नोव्हेंबर) दिला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
नवाब नलिक म्हणाले, वक्फ बोर्डामध्ये आम्ही क्लीनअप अभियान सुरू केले आहे. ईडी (ED) या मोहिमेत खरंच सहकार्य करत असेल तर, ज्या भाजपच्या माजी मंत्र्यांनी मंदिराच्या नावाखाली शेकडो एकर जमीन बळकावण्याचे काम केले आहे. त्यांना जेलमध्ये टाकावे. तसेच, या माजी मंत्र्यांचे भांडेफोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ईडी अधिकाऱ्यांचे जे 'आका' असतील त्यांना खुश करण्यासाठी हा कारवाईचा खेळ खेळला जात आहे. जर खरच काही सत्यता असेल तर, ईडीने पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली. ही लढाई आम्ही चोरांच्या विरोधात छेडली आहे, याला शेवटपर्यंत नक्कीच घेऊन जाणार असल्याचा पुनरोच्चार मलिक यांनी यावेळी केला.
दरम्यान, भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी मलिक यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला आहे. शेख म्हणाले, महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाचा गेली दोन वर्षे भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आहेत. या तक्रारी मी ईडीकडे देणार असल्याचे शेख यांनी सांगितले. मुंब्र्यातील जमीन ही मलिक यांनी मनमानी करत लिजवर दिली आहे. कुर्ला भागात चरस मलिक म्हणून कोणाला म्हटले जाते याचा खुलासा मी करणार आहे. तसेच, एका मोठ्या पत्रकाराची हत्या आणि अंडरवर्ल्ड यांच्यातला संबंध मी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगत, पुढीव वर्षभरात मलिक हे तुरुंगात असतील, असा दावाही शेख यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.