अनिल देशमुखांच्या सुनावणीच्या वेळी सुप्रिया सुळे न्यायालयात उपस्थित

अनिल देशमुखांची (anil deshmukh) बाजू मांडणारे वकील अॅड. विक्रम चौधरी यांच्यासोबत सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी चर्चा केली.
anil deshmukh, supriya sule
anil deshmukh, supriya sulesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : संकटात सापडलेल्या पक्षातील नेत्यांच्या मदतीला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच धावून जातात. आजही सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला आधार देण्यासाठी धावून गेल्या. राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (anil deshmukh) खंडणी वसुलीचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांची ईडीकडून चैाकशी सुरु आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत असल्याने ईडीकडून त्यांना उच्च न्यायालयात आज हजर करण्यात आले.

आजच्या ईडी कोठडीच्या सुनावणीच्या निमित्तानेही सुळे या सत्र न्यायालयात दिसल्या. अनिल देशमुख यांना रिमांडसाठी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले, तेव्हा सुप्रिया सुळे या देशमुखांच्या वकीलांशी चर्चा करताना दिसल्या. अनिल देशमुख दिसताच सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख या दोघांनी एकमेकांना हात जोडले. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात आणण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ तारखेला होणार आहे.

अनिल देशमुखांची (anil deshmukh) बाजू मांडणारे वकील अॅड. विक्रम चौधरी यांच्यासोबत सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी चर्चा केली. सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. कोर्ट रूमच्या बाहेर फक्त दोघांनी एकमेकांकडे बघून हात जोडून नमस्कार केला. यापूर्वीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेते अडचणीत आले होते, तेव्हा सुप्रिया सुळेच या मदतीला धावून गेल्याचे दिसून आले होते.

या प्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांची समोरासमोर चौकशी करायची असल्याने अनिल देशमुखच्या (anil deshmukh) कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडीने ED)आज न्यायालयात केली.

anil deshmukh, supriya sule
किरण गोसावीचा आणखी एक प्रताप ; भोसरीतील तरुणाला नोकरीसाठी गंडा

यावेळी अनिल देशमुखांनी न्यायाधीशांना आज लेखी पत्र दिलं. ''दहा दिवसापासून ईडीनं मला कोठडीत ठेवलं आहे. या दरम्यान मला दोनशेहून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मात्र जे ईडीला अपेक्षित आहे, त्यासंदर्भात माझ्याकडे आता सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे मला आता ईडीची कोठडी दिली जाऊ नये,'' अशी विनंती देशमुखांनी न्यायालयासमोर केली.

''सचिन वाझे याची कोठडी संपल्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करता येईल. गरज पडल्यास त्यावेळी अनिल देशमुखांची कोठडीही नंतर न्यायालयाच्या परवानगीने घेता येईल. सचिन वाझे सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत आहे, उद्या त्याची रिमांड वाढवली तर?,” असा सवाल देशमुखांचे वकील विक्रम चौधरी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com