Mumbai, 22 May : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आतापर्यंत पती, सासू आणि नणंद अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत. याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठे विधान केले असून ते ‘दोघे कुठल्याही बिळात लपलेले असले तरी आम्ही त्यांना शोधून काढू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले, अशा प्रकारच्या घटनांमध्ये राजकारणा होणार नाही. ती व्यक्ती कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असली तरी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अजितदादांनी राजेंद्र हगवणे याची पक्षातून हकालपट्टी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तींना कोठेही स्थान मिळणार नाही. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. अशा घटनांना आळा बसविण्यासाठी कडक कारवाई केली जाईल.
वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavne) मृत्यूप्रकरणातील आरोपी सासरा आणि दीर हे कुठल्याही बिळात लपून बसलेले असले तरी त्यांना शोधून काढू. त्यांच्या कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुठल्याही पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असणार नाही. पोलिसांना कारवाईसाठी स्वतंत्र दिले जाते, असे कदम यांनी नमूद केले.
योगेश कदम म्हणाले, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी या अगोदर कोणी तक्रार दिली होती का? तक्रार दाखल करायला कोणी आलं होतं का? आले असेल तर ती तक्रार का घेण्यात आली नाही, याबाबतची संपूर्ण माहिती घेतली जाईल. त्याबाबतची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. पण महिलांवर अशा प्रकारचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही.
हुंड्याबाबत जनजागृती आणि समाज जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहेच. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आणि सुसंस्कृत आहे. त्यामुळे जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा जनजागृतीची आवश्यकता आहे, हे जाणवतंच. जेव्हा सून घरात येते, तेव्हा तिला नवं आयुष्य सुरू होईल, अशी अपेक्षा तिला असते. त्यामुळे ही विकृत वृत्ती बदलण्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे, अशी अपेक्षाही गृहराज्य मंत्र्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.