प्रकाश लिमये
Pratap Sarnaik News : मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनी विरोधात अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेला कक्ष स्वखर्चाने स्थापन केला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी गुरुवारी मिरा भाईंदर मध्ये लोकदरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात नागरिकांकडून तक्रारीचा अक्षरश: पाऊस पडला. या तक्रारींमध्ये चार ते पाच तक्रारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनी विरोधातील होत्या. या तक्रारींची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सरनाईक यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांवर अन्याय होऊ नये यासाठी लोकदरबाराचे आयोजन आपण केले आहे. त्यात सेव्हन इलेव्हन कंपनी विरोधातील तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.
या सर्व तक्रारी योग्य आहेत की नाही यांची खातरजमा करण्यासाठी महसूल, युएलसी विभाग व महापालिका यांचे निवृत्त अधिकारी, वकील, वास्तुविशारद यांची एक समिती तयार करून त्यांचा एक विशेष कक्ष स्थापन केला जाईल.
कंपनी विरोधात आलेल्या सर्व तक्रारींच्या कागदपत्रांची हे अधिकारी तपासणी करतील व आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही त्याची माहिती दिली जाईल असे सरनाईक यांनी सांगितले.
लोक दरबारात अधिकाऱ्यांची दांडी लोकांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना लोक दरबारात उपस्थित रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु एमएमआरडीएचे अधिकारी मात्र उपस्थित राहिले नाहीत. यावरून सरनाईक चांगलेच संतप्त झाले. एमएमआरडीएच्या अधिकारी हरवले आहेत अशी पोलिसांत तक्रार देतो असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलेच सुनावले.
नरेंद्र मेहता म्हणाले, सरनाईक यांच्या लोक दरबारात आणलेले तक्रारदार पूर्व नियोजित होते. सरनाईकांनी फक्त एकच बाजू ऐकली आहे, माझी बाजू त्यांना माहिती नाही. त्यांनी तक्रारींची जरूर चौकशी करावी म्हणजे सत्य समोर येईलच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.