मोठी बातमी! भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा 'समृद्धी' महामार्गावर अपघाती मृत्यू!

Samruddhi expressway accident latest news : भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची संपूर्ण माहिती, कारणे आणि ताज्या अपडेट्स वाचा.
Shocking! Associate Jitendra Shelke of Bhondu Kharat Dies in Samruddhi Expressway Accident
Shocking! Associate Jitendra Shelke of Bhondu Kharat Dies in Samruddhi Expressway AccidentSarkarnama
Published on
Updated on

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिर्डीजवळील धोत्रे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अपघात की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

जितेंद्र शेळके हे संभाजीनगरहून शिर्डीकडे आपल्या कुटुंबासह कारने निघाले होते. समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात घुसली. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.

Shocking! Associate Jitendra Shelke of Bhondu Kharat Dies in Samruddhi Expressway Accident
Top 10 News : महाराष्ट्रात पुन्हा अघोरी कृत्ये! आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले विधवा-कुमारिकांच्या अवयवांचे फोटो ; परतवाडा प्रकरणातील अयानचा 'त्या' रात्रीचा धक्कादायक व्हिडिओ समोर, वाचा टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी!

या घटनेत त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर पत्नी गाडीत अडकून पडल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, काही प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातामागे कोणता घातपात आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच खरात यांच्या व्यावसायिक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग होता. काही सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात यांना अटक झाल्यानंतर शेळके मानसिक तणावाखाली होते.

Shocking! Associate Jitendra Shelke of Bhondu Kharat Dies in Samruddhi Expressway Accident
Sahar Shaikh : 'कैसे हराया...' फेम सहर शेख थेट वानखेडेवर! 'नॉट रिचेबल' असल्याच्या चर्चांनंतर 'त्या' व्हिडिओने सोशल मीडियावर उडाली खळबळ!

या अपघातामुळे आधीच चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून, अपघाताचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com