Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar on Wagh Nakh : वाघ नखांवरून मुनगंटीवारांचा विरोधकांना कडक इशारा, म्हणाले, 'याद राखा षडयंत्र केले तर..'

Sudhir Mungantiwar warning to opposition on wagh nakh : वाघ नखांवरून विरोधकांनी निर्माण केलेल्या सर्व भ्रम दूर करत आक्षेप घेणाऱ्या इतिहास तज्ज्ञांना देखील मंत्री मुनगंटीवार यांनी सुनावले.

Pradeep Pendhare

Assembly Monsoon Session : वाघनखांवरून रणकंदन सुरूच आहे. विरोधकांच्या आरोपावर भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत, विरोधकांवर गंभीर आरोप केले. वाघनखांबाबत सराईतसारखे युवा नेते खोटं बोलताना दिसत आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

वाघ नखाबाबतच वाद निर्माण करून दिला जात आहे. आरोप केले जात आहेत. खोटे भ्रम निर्माण करून दिलेत. अभ्यास न करता यात राजकारण केले जातेय. यात नक्की कुठेतरी षडयंत्र रचले जात आहे, अशी शंका सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने लंडनमधून वाघनख आणण्याच्या हालचालींना तीव्र वेग आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून यावर कार्यवाही सुरू आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेत, सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तर इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी देखील वाघनखांवर अक्षेप घेतलाय. त्यामुळे वाघनखांवरून अधिकच रणकंदन सुरू झाले आहे. विरोधकांनी सताधाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी पलटवार केला आहे. अभ्यास न करता बोलल्याने विरोधकांनी महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान केला. जनतेने त्याची दखल घ्यावी, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

सराईत नेत्यासारखे युवा नेते खोटं बोलत आहेत, असे सांगून वाघ नखांभोवती निर्माण केलेल्या भ्रमावर विरोधकांना सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले. एकमेव अपवाद वगळता जगातल्या कोणत्या इतिहास तज्ञाने महाराष्ट्रात आणत असलेल्या वाघ नखांबाबत आक्षेप घेतलेला नाही. वाघ नखांबाबत भ्रमक कल्पना मांडल्या जात आहेत.

वाघनखं भाड्याने आणली जात आहेत. खरंतर भाड्याने आणणे, असे म्हणणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. एक रुपयाचं भाडं न देता, ही वाघनखं आणली जात आहेत. संपूर्णपणे मोफत! सुरुवातीला एक वर्ष देण्यात येणार होती. आता ती तीन वर्षांसाठी लंडनमधील वस्तुसंग्रहालयाने उपलब्ध करून दिली आहेत. सातारा येथे येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व वंशाजासह वाघ नखांच्या दर्शनाचा सोहळा करण्यात येणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

वाघनखं आणण्यासाठी 30 कोटी रुपयांचा खर्च झाला. या मुद्द्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हा आकडा कोणत्या सुपीक डोक्यातून आला. हा नापिक आकडा आहे. यासाठी फक्त 14 लाख रुपये खर्च झाला आहे. यासाठी 30 कोटी रुपये खर्च झाला आहे, हा भ्रम आहे. जनतेने याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. या वाघ नखांबाबत जे इतिहासकार शंका उपस्थित करत आहेत, त्याच इतिहासकाराने स्वतःच्या पुस्तकांमध्ये ही वाघ आणली गेली पाहिजेत, असा उल्लेख केला आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगून इंद्रजीत सावंत यांची कोंडी केली.

लंडनमध्ये दहा दिवस गेलो, असे सांगितले जाते. परंतु मी तिथे फक्त दोनच दिवस होतो, असे सांगून मुनगंटीवार यांनी तारखा देखील जाहीर केल्या. सराईत नेत्यासारखं काहीही युवा नेते बडबडत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांचे नाव न घेता लगावला. या संवेदनशील विषयावर कोणीही राजकीय वाद घालून महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान करू नये, असे आवाहन केले.

वाघ नखांबाबत इतर कोणतेही सक्षम पुरावे असतील, तर विभागाकडून पडताळणी करून घेण्यास तयार आहोत. परंतु जे आक्षेप घेत आहेत, ते बैठकीला समोर येत नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांनी देखील या वाघ नखांबाबत आक्षेप घेतलेला नाही. खोटे भ्रम निर्माण केले जात आहे. कुठे काहीतरी षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप सुनीर मुनगंटीवार यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT