Sudhir Mungantiwar: विधानसभेत शिवरायांच्या वाघनखांवर चर्चा, इंद्रजित सावंतांच्या दाव्यानंतर मुनगंटीवार यांचे उत्तर...

Sudhir Mungantiwar on Shivaji Maharaj Vaghankhe: १९ जुलैला हे वाघनखं साताऱ्यातल्या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत, ही वाघनखं आणण्यासाठी १४ लाखांचा खर्च झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत, असा खबळजनक दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant)यांनी केला आहे. विधानसभेत शिवरायांच्या वाघनखांवर चर्चा झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली.

ते म्हणाले, "शिवाजी महाराज यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत अनेक शिवभक्तांनी सरकारला माहिती दिली होती.त्यानंतर सरकारने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार केला. त्यांचे उत्तर आले. त्यांनी काही छायाचित्र पाठविली होती,"

ही वाघनखं ठेवण्यासाठी १८२५ मध्ये एक डबी बनवली ‌होती‌. काही पुरावे ‌बघितले. त्यानंतर व्हिक्टोरिया संग्रहालयात ती वाघनखं असल्याचं आढळले. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा दावा कोणीही केलेला नाही, असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. १९ जुलैला हे वाघनखं साताऱ्यातल्या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत, ही वाघनखं आणण्यासाठी १४ लाखांचा खर्च झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

Sudhir Mungantiwar
Belapur Constituency Election 2024: 'बेलापूर'मध्ये भाजपच्या आजी-माजी आमदारामध्ये रस्सीखेच; कोण बाजी मारणार?

सावंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून शिवप्रेमींची फसवणूक केली जात आहे, या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम संचालकांनी आम्हाला पाठवलेल्या पत्रात ही वाघनखं शिवरायांची असल्याबाबतचा आमच्याकडे कोणताही पुरावा नसल्याच म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे.

इंद्रजित सावंत यांचा दावा

  • शिवरायांची खरी वाघनखं साताऱ्यातील छत्रपती घराण्यातच आहेत.

  • याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः समोर येऊन बोलावं.

  • सरकारने या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नये,

  • लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com