Mira-Bhayandar Municipal Corporation announces ward reservation; major political parties prepare for new electoral battle. sarkarnama
मुंबई

Mira-Bhayandar Ward Reservation : दिग्गज सुरक्षित, पण 'या' नेत्यांना आरक्षणाचा मोठा फटका! मिरा-भाईंदर निवडणुकीत राजकीय भूकंपाचे संकेत!

Mira-Bhayandar Mira-Bhayandar Municipal Corporation : मिरा-भाईंदर महापालिकेची आरक्षण सोडत आज जाहीर केली आहे. या सोडतीमध्ये अनेक माजी नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मिरा-भाईंदर महनगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (मंगळवार) आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत सर्वच राजकीय पक्षांच्या बहुतांश दिग्गज नेत्यांचे प्रभाग सुरक्षित राहिले आहेत. मात्र, काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसल्याने ते अडचणीत आले आहेत. या आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना नोंदविण्याची मूदत देण्यात आली आहे.

महापालिकेच्या २४ प्रभागातील ९५ जागांसाठी महापालिकेच्या डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात ४८ जागा महिलांसाठी २५ जागा नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी, ४ जागा अनुसुचित जातींसाठी व एक जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली.

या सोडतीत सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित राहिल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यात प्रामुख्याने माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, माजी महापौर डिंपल मेहता ( दोन्ही भाजप) व माजी महापौर कॅटलीन परेरा (शिवसेना शिंदे गट)  यांच्या प्रभागांचे आरक्षण पूर्वीसारखेच राहिल्याने त्याच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत.

याव्यतिरिक्त माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी उपमहपौर चंद्रकांत वैती, माजी सभागृह नेते रोहिदास पाटील व प्रशांत दळवी, माजी स्थायी समिती सभापती रवी व्यास, दिनेश जैन व मॉरस रॉड्रीग्ज, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती दिपिका अरोरा त्याचप्रमाणे भाजपचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष पंकज पांडे (सर्व भाजप) यांच्यासह माजी उपमहपौर प्रवीण पाटील, माजी विरोधी पक्षनेता राजू भोईर ( दोघे शिवसेना शिंदे गट) व काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते जुबेर इनामदार यांच्या जागाही सुरक्षित राहिल्या आहेत.

भाजपचे माजी स्थायी समिती सभापती धृवकिशोर पाटील यांची जागा महिलांसाठी राखीव झाली आहे मात्र पाटील यांना त्याच प्रभागात दुसर्‍या जागेवर लढणे शक्य असल्याने त्यांना प्रभाग बदलावा लागणार नाही.

शिवसेनेचे शिर्के अडचणीत

प्रभाग रचनेसाठी 2011 चीच लोकसंख्या गृहित धरण्यात आली असल्याने अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींसाठी गेल्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग आरक्षित झाले असल्याने त्यासाठी वेगळी सोडत काढण्यात आली नाही. मात्र अनुसुचित जातींच्या चार जागांपैकी दोन जागा महिलांसाठी अरक्षित करायच्या असल्याने त्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत शिर्के यांना आपल्या जागेवर पाणी सोडावे लागले आहे. ते निवडून आलेली जागा अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे त्यांना घरी बसावे लागणार आहे अथवा अन्य प्रभागात आसरा घ्यावा लागणार आहे.

शेट्टी, थेराडे, म्हात्रेंसाठी धोक्याची घंटा

भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी, संजय थेराडे व सचिन म्हात्रे यांचीही राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. शेट्टी यांची जागा ओबीसीसाठी तर थेराडे व म्हात्रे यांच्या जागा महिला ओबीसींसाठी राखीव झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल सावंत व राजीव मेहरा यांच्यापैकी एकालाच ते निवडून आलेल्या प्रभागातून पुढील निवडणूक लढवता येणार आहे. सावंत व मेहरा हे सर्वसाधारण प्रभागातून निवडून आले होते मात्र त्यातील एक जागा ओबीसी राखीव झाल्याने त्या प्रभागातील एकमेव सर्वसाधारण जागेवर दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे. या सर्वांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी अन्य प्रभागांचा आसरा घ्यावा लागणार आहे मात्र त्यासाठी पक्षप्रमुखांची मिनतवारी करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT