Thane Political News  Sarkarnama
मुंबई

CM Shinde Vs Thackeray Group : '...तर वरळीत येऊन पाडू'; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा

Shivsena Shinde Group Vs Shivsena Thackeray Group : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेने बॅनरबाजी करत आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे.

Pankaj Rodekar

Thane Political News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघातून लढण्याचे थेट आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंनी दिलेले हे आव्हान शिवसेना शिंदे गटाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. यानंतर शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आता शिंदे गटाच्या युवासेनेने बॅनरबाजी करत ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. (CM Shinde Vs Thackeray Group)

शिवसेना शिंदे गटाच्या 'युवासेनेने ठरवले तर आदित्य ठाकरे यांना वरळीत येऊन पाडू', असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या दोन्ही गटांत वादविवाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 24 फेब्रुवारीला ठाण्याच्या रेमंड मैदानात शिंदे गटाच्या युवासेनेचा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे.

त्यानिमित्ताने युवासेनेच्या वतीने मेळाव्याचे बॅनर कॅडबरी सिग्नल येथे लावण्यात आले आहे. त्या बॅनर्सवर 'ठाण्यामध्ये नका भाषण झाडू...युवासेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू', असा सज्जड दम वजा इशारा नाव न घेता आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबरोबरच या बॅनर्सच्या मधोमध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आहे. याशिवाय दिवंगत बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्रांसह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि राहुल लोंढे यांचे छायाचित्र आहे. तसेच त्या बॅनरवर 'चलो रेमंड' असे असून मेळाव्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, ठाण्यात बॅनरबाजी काही नवीन नाही. त्यामुळे या बॅनरला आता शिवसेना ठाकरे गटाकडून कसे उत्तर मिळते, तेच पाहावे लागणार आहे. या बॅनरवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये वाद पेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशा प्रकारे बॅनर लावून शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला एक प्रकारे डिवचण्याचे काम केले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT