Shivsena Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Shilpa Bodkhe Resign : राजीनामा देताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून शिल्पा बोडखे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत गंभीर आरोप केले आहेत. (Shivsena Thackeray Group)

शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत पक्षातील दोन महिल्या नेत्यांवर षडयंत्राचा आरोप केला आहे. तसेच 'हाताचा मटणाचा वास गेला असेल तर पुन्हा नागपूरमध्ये येऊन सावजीवर ताव मारा,' असा खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

Uddhav Thackeray
Ashok Chavan Nanded Daura : भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेड दौऱ्यावर; आता कळणार खरी ताकद

गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेकांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यातच देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

शिल्पा बोडखे यांनी राजीनामा देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शब्दाला काहीच किंमत न देता विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे चर्चांना उधाण आलं असून, यावर आता ठाकरे गटातील नेते काही प्रतिक्रिया देतात का ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

शिल्पा बोडखे यांनी काय म्हटलं ?

"माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र...माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली, याचे दु:ख आहे. पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचेदेखील अभिनंदन. पुढेदेखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येऊन सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा", असं शिल्पा बोडखे यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Uddhav Thackeray
Gondia Bridge Controversy : दोन आमदारांनी केले भूमिपूजन, तरी गावकऱ्यांवर आली अर्ध जलसमाधी घेण्याची वेळ !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com