Ashish Shelar, Rupali Chakankar
Ashish Shelar, Rupali Chakankar sarkarnama
मुंबई

आमदार आशिष शेलारांचा रुपाली चाकणकरांना इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) चांगलाच वाद रंगला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत, राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या बद्दलचा स्तुस्थिीदर्शक अहवाल पाठऊन देण्याची सुचनाही केली होती. त्यावर शेलार यांनी आयोगाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला दिली आहे.

या संदर्भात शेलार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये शेलार म्हणाले, महापौर व महिलांचा अवमान केल्याची तक्रार महिला आयोग, पोलिसांकडे जे करीत आहेत, त्यांनी पत्रकार परिषद एकदा निट पूर्ण ऐकावी. मी जे बोललोच नाही, ते महापौरांशी जोडून हेच महापौरांचा अवमान करीत आहेत. जाणीवपूर्वक सत्याकडे दुर्लक्ष केले जात, असेल तर मलाही कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा त्यांनी महिला आयोगाला दिला आहे.

चाकणकर यांनी काय म्हटले होते.

चाकणकर यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल बोलताना शेलार यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले, असे चाकणकर म्हणाल्या होत्या.

दरम्यान, शेलार यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीनेही शिवसेना महिला आघाडी कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या संदर्भात नगरसेविका विशाखा राऊत, उपनेत्या मीना कांबळे तसेच मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुख खांनी शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT