Bhaskar Jadhav News, Eknath Shinde news Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Guwahati : भास्कर जाधव चिपळूनमध्येच

भास्कर जाधवही (Bhaskar Jadhav) सध्या नॉट रिचेबल असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरून 40 च्यावर आमदार गुवाहाटी (guwahati) येथे घेऊन गेले. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही, महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडा अशी मागणी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केली आहे. (Eknath Shinde news update)

अजून काही आमदार त्यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु असताना शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्कर जाधवही (Bhaskar Jadhav) सध्या नॉट रिचेबल असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मागच्या दोन दिवसांपासून जाधव यांना शिंदे गटाकडून फोन करून संपर्क करण्यात येत होता. ते गुवाहाटीला निघाले असल्याचे वृत्त येत असताना त्यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. (Bhaskar Jadhav News)

"जाधव हे चिपळूणमध्येच आहेत त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्यामुळे जाधव चिपळूणमध्ये आले असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनच जाधव गावी आल्याचे सांगण्यात आले.

भास्कर जाधव गुहावटीमध्ये गेल्याच्या बातम्या निराधार असल्याचेही सांगण्यात आले. जाधव हे गुहागरचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते सेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोरदार विरोध करीत असतात.

शिवसेनेच्या (shivsena)बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी काल माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. "आम्हाला फसवणूक नेले होते," असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटातून आपली सुटका केलेल्या या दोन आमदारांनी सांगितले. "शिंदेच्या गटातील आमदारांची परत येण्याची इच्छा आहे, पण त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे," असा आरोप यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केला. "मावळ्यांनो, परत या!" अशा शब्दात देशमुखांनी गुवाहाटीतील आमदारांनी विनंती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT