२४ तासात मुंबईत या,तुमच्या मागणीचा विचार होईल ; बंडखोर आमदारांना शिवसेनेचे आवाहन

बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आवाहन राऊत यांनी दिले.
 sanjay raut
sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे गटाला आवाहन केले.

संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी," " बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आवाहन राऊत यांनी दिले.

शिवसेनेच्या बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. "आम्हाला फसवणूक नेले,"असे एकनाथ शिंदे यांच्या गटातून आपली सुटका केलेल्या या दोन आमदारांनी सांगितले. आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या अपहरण आणि सुटकेची कहानी यावेळी सांगितली.

 sanjay raut
शिवसेनेचा बंडखोरांना इशारा : वेळीच सावध व्हा, नाहीतर सगळेच कायमचे 'माजी' होतील

राज्यात शिवसेनेच्या मुख्य नेतेमंडळींनी बंडखोरी केल्याने शिवसेनासह महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट भाजप शासित प्रदेश आसामच्या गुवाहटीत असून, दोन दिवसांपासून ते 'रेडीसन ब्ल्यू' या ठिकाणी तळ ठोकून आहेत. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या भाष्याबद्दल राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपला मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासोबत एकनाथ शिंदे गटाला वेळीच सावध होण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com