Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईबद्दलच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या कामावर जोरदार ताशेरे ओढले. "विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगा हे प्रकरण गांभीर्याने घ्या", अशा शब्दांत नार्वेकरांना सुनावलं. यानंतर आता नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अनादर केला जाणार नाही. कोणतीही तडजोड न करता हा निर्णय घ्यायचा असून योग्य तो निर्णय मी घेईल. यामध्ये न्यायालायाच्या आदेशाचा कुठेही अनादर केला जाणार नाही. विधीमंडळाचे सार्वभौमत्व राखणे हे माझे कर्तव्य आहे", अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली.
"निवडणूक चिन्ह समोर घेऊन मी निर्णय देत नाही. या प्रकरणावर लवकरात लवकर मी निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मी नियम न पाळता निर्णय घेतला तर ती चूक होईल. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून मला निर्णय घ्यायचा आहे", असेही नार्वेकर म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर निकाल देण्यास विलंब होत असल्याने ठाकरे गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तसेच या प्रकरणाचा निकाल देण्यास विलंब होत असल्याने नार्वेकरांना फटकारलं होतं.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.