Shiv Sena MLA Disqualification : नार्वेकरांना ICU मध्ये ठेवण्याची वेळ आली; असे राऊत का म्हणाले?

Supreme Court : हे दहा पक्ष फिरून बारा गावाचं पाणी प्यायलेले लोक आहेत.
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA DisqualificationSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

"विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनावण्याच्या योग्यतेचे आहेत. सरकार जाण्याची वेळ आता आली आहे. जितका वेळ आयसीयू (ICU)मध्ये ठेऊन सरकार वाचवायचे होते ते अध्यक्षांनी वाचवले आहे. आता अध्यक्षांनाच ICU मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे.

Shiv Sena MLA Disqualification
Nashik Drugs News : नाशिकच्या गुंडांना भुजबळ-भुसेंनी पोसलंय; राऊतांचा गंभीर आरोप

"हे दहा पक्ष फिरून बारा गावाचं पाणी प्यायलेले लोक आहेत. त्यांना पक्षांतर, घटनाबाह्य सरकार यांच्याशी घेणं नाही. त्यांना दिल्लीच्या आदेशाने सरकार वाचवायचं आहे. घटना पदावर बसलेल्या व्यक्तीने नीतिमत्ता आणि मर्यादा ठेवली पाहिजे," असा सल्ला राऊतांनी दिला.

"कायदा एकच आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हा निर्णय लागू होईल. विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात न्यायालयाने हातोडा मारला आहे. ते दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात तुम्ही आम्हाला तुमचा निर्णय सांगू नका. निर्णय आम्ही करू. 2024 पर्यंत पण थांबण्याची गरज नाही," असा इशारा त्यांनी दिला.

न्यायालयाने नार्वेकरांची कानशिलं सुजवली...

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. "सर्वोच्च न्यायालयाने आज नार्वेकरांची कानशिलं सुजवली आहेत. गाल लाल केले आहेत. अध्यक्षांनी संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवायची ठरवलं होतं. त्यामुळे कोर्टानं श्रीमुखात भडकावली. शुद्धीवर या," असे सावंत म्हणाले.

Shiv Sena MLA Disqualification
Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या घरी आढळले तीन किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com