Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ncp Mla Disqualification : अजित पवार गटाच्या आमदारांचा 'मेरा जवाब'

Ncp Mlas Disqualification Case Hearing : राष्ट्रवादीत त्यावेळी काय घडलं? अजित पवारांचे आमदार सांगणार?

Jui Jadhav

Sharad Pawar Group vs Ajit Pawar Group :

राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याचा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. आजपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे आज लिखित उत्तर सादर करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे 7 आमदार आज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे त्यांचे लिखित उत्तर सादर करणार आहेत. आजपासून NCP च्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. आमदारांचे नेमके काय म्हणणे आहे? किंवा आमदार नेमके कोणाच्या बाजूने आहेत? या सगळ्याचे लेखी उत्तर आमदारांना द्यावे लागणार आहे.

सुनावणीचे विषय नेमके काय आहेत? हे आज नक्की केले जाणार आहेत. कशा प्रकारे ही सुनावणी चालेल, याचा आराखडादेखील आज निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णयदेखील विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 31 जानेवारीपर्यंत हा निकाल देणे अनिवार्य असणार आहे. आज लेखी उत्तर सादर केल्यावर 18 जानेवारीला प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे आणि मग प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे.

कशी असेल सुनावणी?

> 18 जानेवारी प्रतिज्ञापत्र सादर करणे.

> 20 जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी

> 23 जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलटतपासणी

> 25 आणि 27 जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या निकालाचा परिणाम

काही दिवसांपूर्वी शिवसेना कोणाची? हा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निर्णय देण्यात आला. त्यांच्याकडे बहुमत आहे आणि त्यांच्या घटनेची नोंद नसल्यामुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंना काढू शकत नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय दिला आहे. तशीच परिस्थिती राष्ट्रवादीचीदेखील असू शकते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जास्त आमदार आहेत, बहुमत त्यांच्याकडे असून राष्ट्रवादीचा निर्णयदेखील अजित पवारांच्या बाजूने लागेल, असे म्हटले जात आहे. शरद पवार गटानेही निवड चुकीची झाली, असा दावा केला होता. याच कारणांमुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागेल? असा विश्वास नेत्यांनी दर्शवला आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT