Ajit Pawar News: यशवंतराव चव्हाण सेंटरवर आता अजितदादांचा डोळा?

Yashwantrao Chavan Auditorium Mumbai:यशवंतराव चव्हाण सभागृहाबाबत पवार कुटुंबियांमध्ये वेगळं स्थान
Ajit Pawar News:
Ajit Pawar News: Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले. राष्ट्रवादी कोणी, म्हणजे नाव आणि चिन्ह कोणाचं याचा निकाल थोड्याच दिवसात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह हे आमच्या कडे राहिल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे, तर मुळ राष्ट्रवादी आपली आहे हे वारंवार शरद पवारांकडून सांगितलं जात आहे.

या सगळ्या वादामध्ये आता मुंबईत मंत्रालय शेजारी असलेल्या यशवंतराव सभागृहावर अजित पवार गटाचा डोळा असल्याचं समजत आहे. महायुतीच्या कालच्या महामेळाव्या नंतर, अजित पवार गटाच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवर एकच वादा अजितदादा अशा पद्धतीने समर्थनार्थ घोषणाबाजी दिल्या.

विशेष म्हणजे, यशवंतराव चव्हाण सेंटर, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर शरद पवार यांच्या ताब्यात राहिलं आहे. त्यामुळे या इमारतीच्या पायऱ्यांवर अजित पवार समर्थांकडून घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण या सेंटरचा मोठा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता, त्यावेळेस सुद्धा समर्थकांनी या ठिकाणी सलग तीन दिवस ठिय्या मांडून राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव तंत्रचा वापर करत याच पायऱ्यांवर घोषणाबाजी करत शरद पवारांना राजीनामा मागे घ्यायला लावला. त्यामुळे या सेंटरला पवार कुटुंबियांमध्ये वेगळं स्थान आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य सरकारचे आणि इतरही कार्यक्रम पार पडतात. मात्र त्यावर अजूनही शरद पवार यांचं वर्चस्व आहे. ते स्वतः तिथे जाऊन कामकाज करतात, गाठीभेटी घेतात. मात्र मुळ राष्ट्रवादी पक्ष आमचा आहे असा दावा करणाऱ्या अजित पवार गटाकडून आता यशवंतराव चव्हाण सभागृहावर देखील दावा केला जाणार असल्याची माहीती मिळत आहे.

यशवंतराव चव्हाणांचे फोटो

राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी माझा फोटो वापरायचा नाही. शरद पवार यांनी अशी तंबी दिल्यावर अजित पवार गटाकडून मात्र यशवंतराव चव्हाण यांचे फोटो वापरण्यात आले, आणि आम्ही त्यांच्या विचारधारणेने पक्ष पुढे चालवत आहोत असंही विधान करण्यात आलं.

Edited by: Mangesh Mahale

Ajit Pawar News:
BJP Rajasthan: राजस्थानमध्ये भाजप 'या' चेहऱ्यांवर डाव टाकणार; विजयी आमदारही लढवणार लोकसभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com