Uddhav Thackeray Vs Rahul Narwekar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case : मोठी बातमी! आमदार अपात्रतेचा निकालापूर्वीच ठाकरे गट नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात

Uddhav Thackeray Vs Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट म्हणजे कायद्याचे उल्लंघन

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदारांविरोधात ठाकरे गटाने अपात्रतेची याचिक दाखल केली. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निर्णय देणार आहेत. मात्र नार्वेकरांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अर्ज ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला आहे. आता नार्वेकर काय निकाल देतात, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकाल देण्यास तीन दिवस शिल्लक असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावरून ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निष्पक्षपणावर संशय व्यक्त केला आहे. त्यातूनच ठाकरे गटाच्या वतीने दाखल केलेल्या अर्जात अनेक आरोप करण्यात आले आहेत.

ठाकरे गटाच्या वतीने प्रतोद सुनील प्रभू यांनी हा अर्ज दाखल केला आहेत. त्यात म्हटले, 'आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणे अयोग्य आहे. निःपक्षपातीपणे काम करणे आवश्यक असतानाही अध्यक्षांच्या या कृतीमुळे यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अध्यक्षांचे हे कृत्य हे न्याय्य नसून कायद्याचे उल्लंघन करणारे आहे,' असाही आरोप करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या याचिकेत ठाकरे गटाने निकालाबाबत काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. आमदार अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावेत, असेही अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला 31 डिसेंबर 2023 ही मुदत दिली होती. मात्र नार्वेकरांनी केलेल्या विनंतीनंतर न्यायालयाने अंतिम मुदत 10 जानेवारी 2024 पर्यंत वाढवली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून परस्परविरोधी याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यानुसार ५६ आमदारांना अपात्र ठरवण्यासह एकूण ३४ याचिका प्रलंबित आहेत. आता शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकाल काय लागणार, हे बुधवारी सायंकाळी समजण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT