Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualification : राहुल नार्वेकरांकडून वेळकाढूपणाची हद्द; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

Mangesh Mahale

Mumbai : शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. "उशिराने मिळालेला न्याय म्हणजे एकप्रकारे अन्यायच ठरतो," असे टि्वट करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेऊन द्यावा, असे सांगितले. आता चार महिने झाले तरी निर्णय न झाल्याने ठाकरे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही; पण कोणतीही घाईदेखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही," असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

सुनावणीच्या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धूसर असल्याने आता जानेवारी 2024 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले, "सर्व याचिका एकत्र करा. आमच्या मागणीवर विचार का केला जात नाही?” त्यावर शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी आक्षेप नोंदवला.

"सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्रित नको," असे साखरे म्हणाले. पण सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली तर या प्रकरणावर लवकर निकाल घेता येईल. सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT