Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंच्या विधानावर पटोले भडकले; म्हणाले, 'येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी पत्रकारितेला खरेदी करू पाहत...'

Maharashtra Politics : तुम्ही मतांसाठी जनतेलासुद्धा चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की.
Nana Patole, Chandrashekhar Bawankule
Nana Patole, Chandrashekhar Bawankule Sarkarnama

Pimpri : आपली व्यथा मांडणाऱ्या एका पूरग्रस्ताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओढून नेल्याच्या नागपुरातील घटनेवर विरोधकांनी तुफान हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी रविवारी नगर येथे केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले. त्यातून महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढाई सुरू झाली आहे.

‘महाविजय-2024’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत नगर येथे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बावनकुळेंनी संवाद साधला. या वेळी त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरुद्ध एकही बातमी प्रसिद्ध होऊ नये, यासाठी महिन्यातून एकदा पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा (चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजले असेलच तुम्हाला), त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असे उपस्थितांना सांगितले. याबाबतचे वृत्त आज प्रसिद्ध होताच ते विरोधकांनी निशाण्यावर आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आघाडीवर आहेत.

Nana Patole, Chandrashekhar Bawankule
Omraje Rajenimbalkar News : भाजपचा जनाधार ढासळत चाललाय; ओमराजे निंबाळकरांची टीका

आगामी निवडणुकीत तुम्ही जनतेलाही चिरीमिरी द्याल

बावनकुळेजी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? असा रोकडा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे. देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही, असं ते म्हणाले. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून भाजप विरुद्ध आवाज दाबत आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले ? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेलासुद्धा चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, अशी तोफ त्यांनी डागली.

आता पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत...

येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत, अशी जळजळीत टीका पटोलेंनी केली. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात. परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात, ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचे नाही हे भाजपचे धोरणच आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बावनकुळेंनीच पत्रकारांना `चहापाणी` दिले असावे

लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हा आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर, निषेधार्ह बाब आहे, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

"ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत, त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचे नाही, हे भाजपचे धोरणच आहे, असे सुळे म्हणाल्या. भाजपने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे, अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌, अशी मागणी त्यांनीही केली.

Nana Patole, Chandrashekhar Bawankule
Raju Shetti News: पुढच्या वेळी खासदार होऊनच या! 'बाप्पा'समोर शाहू छत्रपतींनी दिल्या राजू शेट्टींना शुभेच्छा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com