uddhav thackeray sarkarnama
मुंबई

MLC Election 2024 : मुंबई पदवीधरमधून ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार मैदानात, तर शिक्षक मतदारसंघातून...

Akshay Sabale

Mumbai News, 25 May : विधान परिषदेसाठी शिवसेनेनं ( ठाकरे गट ) दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार अनिल परब यांना मुंबई पदवधीर मतदारसंघातून ( mumbai graduate constituency ) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ( mumbai teacher constituency ) ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही अनिल परब ( Anil Parab ) हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यापाठीमागे ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल परब यांनी परिवहन मंत्री म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यातच त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारीनंतर "विजय आमचाच," असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विधिध प्रश्न आणि शिक्षकांच्या समस्यांवर ज. मो. अभ्यंकर यांनी सतत आवाज उठवला आहे. त्यासह महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. आता मुंबई शिक्षक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला. त्यानुसार चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे. विलास पोतनीस, निरंजन डावखेरे, कपिल पाटील, किशोर दराडे 7 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम...

अधिसूचना : 31 मे 2024

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 7 जून

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024

मतदान : 26 जून 2024, सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत

मतमोजणी : 1 जुलै 2024

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT