Cyber Crime News  Sarkarnama
मुंबई

Cyber Crime News : सायबर चोरट्यांनी आमदाराच्या मुलीला घातला गंडा; 480 रुपयांची मिठाई पडली 80 हजाराला

Cyber crime Cases : ऑनलाईन फसवण्यासाठी सायबर चोरटे अनेक शक्कल लढवतात. आता थेट आमदाराच्या मुलीलाच सायबर चोरट्यांनी गंडा घातला.

Ganesh Thombare

Mumbai News: सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळते. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जाते. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यात देखील वाढ होत आहे. अनेकदा सायबर चोरटे अनेक उच्च शिक्षित लोकांचीही फसवणूक करतात. ऑनलाईन फसवण्यासाठी सायबर चोरटे अनेक शक्कल लढवतात. आता थेट आमदाराच्या मुलीलाच सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे.

मिरा-भाईंदर येथील भाजपच्या आमदार गीता जैन यांची मुलगी स्नेहा सकलेजा यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गीता जैन यांच्या मुलीची मिठाई खरेदी करताना तब्बल 80 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यामुळे 480 रुपयांची मिठाई त्यांना तब्बल 80 हजार रुपयांना पडली आहे. या प्रकारानंतर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गीता जैन यांची मुलगी स्नेहा सकलेजा यांच्या सासूने दिवाळीनिमित्त एका मिठाई विक्रेत्याकडून मिठाई खरेदी केली. यानंतर या मिठाईचे पैसे विक्रेत्याने ऑनलाईन पाठवायला सांगितले. यानंतर स्नेहा सकलेजा यांच्या सासूने स्नेहा सकलेजा यांना विक्रेत्याला पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी विक्रेत्याच्या स्कॅनरवर 480 रुपये पाठवले.

मात्र, काही वेळ झाल्यानंतर एका व्यक्तीने फोन करत आपण मिठाई विक्रेता बोलत आहे, असे सांगून तुम्ही जे 480 रुपये भरले, त्याचे जीएसटीसाठी नोट हवी आहे, असे सांगितले. तसेच मी सांगतो तसे टाईप करा, असे सांगितल्यावर स्नेहा सकलेजा यांनी तशी प्रक्रिया केली.

त्यानंतर स्नेहा यांच्या बँकेच्या अकाउंटवरून दोन टप्प्यात तब्बल 80 हजार रुपये कट झाले. पैसे कट झाल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी पुन्हा मिठाई विक्रेत्याशी संपर्क साधला. पण नंतर मोबाईल बंद लागला. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर नवघर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT