Yavatmal Rohit Pawar Visit : मी तुमच्यासाठी काय करू शकतो म्हणताच महिलेच्या डोळ्यातील अश्रू अनावर

Farmer's Meet : शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना रोहित पवार व कुटुंबीयांचा कंठही दाटला
Rohit Pawar at Yavatmal
Rohit Pawar at YavatmalSarkarnama
Published on
Updated on

District of Maximum Suicide : यवतमाळ जिल्ह्यातील वरुड (तुका) छोटंस गाव. गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबांतील प्रमाखाचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. कुटुंब प्रमुख नसल्यानं अन्य सदस्यांवर उपासमारीची वेळ आलीय. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार गावात पोहोचतात. कुटुंबातील महिलेशी संवाद साधतात. ‘ताई मी तुमच्यासाठी काय करू शकतो’, असा प्रश्न रोहित यांनी विचारतात महिलेच्या अश्रूंचा बांध फुटतो. हे पाहुन रोहित पवार व त्यांच्या परिवाराचा कंठही दाटतो.

सोमवारी (ता. १३) हा भावनिक प्रसंग अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावून गेला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा अशी शासन दरबारी नोंद असलेल्या यवतमाळचा दौरा रोहित पवार यांनी केला. त्यावेळी आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या दुर्गम परिसरातील वरुड (तुका) या आदिवासीबहुल गावात रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा, बहिण सई, पत्नी कुन्ती, सलील देशमुख, आशिष देशमुख हे पोहोचले. गावातील एकेकाची व्यथा ऐकताना सर्वांचेच डोळे पाणावले. (NCP MLA Rohit Pawar & His Family Got Emotional After Hearing the Pain of Farmer's Family Who Committed Suicide in Yavatmal)

शेतकरी कुटुंबांची भेट घेताना पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी बाजीवर (खाट) बसत गावात चहा व नाश्ता घेतला. वरुड (तुका) येथील ग्रामहीत संस्थेच्या माध्यमातून भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील १६८ महिला उपस्थित होत्या. या महिलांशी आमदार पवार यांनी संवाद साधला. महिलांनी आमदार पवार यांना ओवाळत आपल्या व्यथाही सांगितल्या.

आपल्यावर बेतलेली परिस्थिती कथन करताना अनेकींना अश्रू आवरता आले नाहीत. पवार कुटुंबाकडुन महिलांना साडी-चोळी वाटप करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, फराळाचं साहित्यही देण्यात आलं. आमदार पवार यांनी ग्रामस्थांना शासनाच्यावतीने सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यवतमाळ जिल्ह्यातील समस्या, निम्न पैनगंगा प्रकल्पाची कामं याबद्दल येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करू असंही पवार यावेळी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामहीत संस्थेचे पंकज महल्ले, श्वेता महल्ले, वरुड तुकाच्या सरपंच प्रतिभा मंगाम, नितीन खोडे पाटील, मुबारक तंवर, विजय राऊत, प्रल्हाद जगताप, प्रल्हाद गावंडे, बालाजी येरावार यांनी आमदार पवार यांनी परिसराबद्दल विस्तृत माहिती दिली. गावात दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी नृत्य करीत आमदार पवार यांचं स्वागत केलं. आमदार पवार यांनीही यावेळी नृत्याचा फेर धरला.

Edited by : Prasannaa Jakate

Rohit Pawar at Yavatmal
Yavatmal People got Angry : पोलिसांनी कामाला लागावं , आमच्या पालकमंत्र्यांना शोधून काढावं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com