Jitendra Awhad On Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad On Eknath Shinde : 'वाह रे शिंदे तेरा खेल, सस्ता बिअर-मेहेंगा तेल..' ; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं!

Jitendra Awhad On Eknath Shinde : 'लोकांचे संसार उद्ध्वस्त करून, आपली तिजोरी भरायची आहे, असा सूर विरोधकांकडून आवळला जात होता. '

Chetan Zadpe

Jitendra Awhad On Eknath Shinde : राज्यात बिअर या प्रकारच्या मद्याच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाल्यामुळे राज्यातील शिंजे-फडणवीस-पवार सरकारने शासनाने बिअरचा खप वाढावा, यासाठी एक समिती नेमली आहे. यामुळे राज्य सराकरवर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. सरकारला दारू विकून, लोकांचे संसार उद्ध्वस्त करून, आपली तिजोरी भरायची आहे, असा सूर विरोधकांकडून आवळला जात होता. आता जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'वाह रे शिंदे तेरा खेल, सस्ता बिअर-मेहेंगा तेल,'अशा शब्दात आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. (Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणाले, "लोकांनी आपलीसगळी दुःखं विसरायला हवीत, यासाठी राज्य सरकारकडून नवी पॅालिसी येत आहे. राज्यात बिअरचा खप कमी झाल्याने, बिअरचा खप वाढावा यासाठी एक समिती स्थापन केली गेली आहे. 'वाह रे शिंदे तेरा खेल, सस्ता बिअर मेहेंगा तेल,' अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर वार केला.

काय आहे प्रकरण ?

राज्यात बिअरची विक्री का कमी झाली, याची चिंता महाराष्ट्र सरकारला सतावत आहे. नेमकी बिअर विक्रीत घट का झाली? याचा शोध घेण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय एक समिती स्थापन केली. या समितीने एक महिन्याच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.

शिवसेनेने ठाकरे गटाचीही टीका -

बिअरच्या विक्री वाढावी यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे, सरकारच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटानेही टीका केली होती. "सरकारने एक समिती स्थापन केली आहे, जी राज्यात बिअरची विक्रीत घट का झाली? याचा शोध घेणार आहे. या समितीत बड्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आले आहे. सरकार चिंतेत आहे कारण कमी बिअर विकली तर सरकारला कमी पैसे मिळतील," असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT