Manda Mhatre Nilesh Mhatre sarkarnama
मुंबई

Manda Mhatre Political Legacy : आमदार मंदा म्हात्रेंची दुसरी पिढी निवडणुकीच्या मैदानात! बेलापूरमधून नशिब अजमवणार

Nilesh Mhatre Nimita Mhatre Navi mumbai : सलग तीन वेळा बेलापूर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या मंदा म्हात्रे यांचे राजकीय वारस आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Roshan More

Navi mumbai Politics : नवी मुंबई महापालिकेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. या निवडणुकीत तब्बल 20 वर्षानंतर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची दुसरी पिढी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे. म्हात्रे यांचे पुत्र पुत्र नीलेश म्हात्रे दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरा जाणार आहे, तर नमिता म्हात्रे बेलापूर गावातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 20 वर्षानंतर नीलेश म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

नीलेश हे भाजपचे महामंत्री आहेत. तसेच त्यांच्याकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या संयोजक पदाची देखील जबाबदारी आहे. मंदा म्हात्रे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नीलेश हे 2000 मध्ये नगरसेवक होते. मात्र, पुढील निवडणुकीत डॉ. जयाजी नाथ यांचा राष्ट्रवादीकडून अचानक अर्ज आल्याने म्हात्रे यांचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर आईसोबत समाजकार्यत नीलेश हे कार्यरत होते.

समाजकार्यत सक्रिय असताना नीलेश यांनी बेलापूर मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. तरुणांनासोबत घेत त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. पक्षांतर्गत कार्यकर्ते व मोर्चेबांधणी करून संघटनेला बळ देण्याचे काम केले. त्यामुळे मंदा म्हात्रे यांचा राजकीय वारसा ते समर्थपणे चालवतील अशी चर्चा होती. मात्र, ते निवडणुकीच्या मैदानापासून लांब होते. मात्र, तब्बल 20 वर्षानंतर ते निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहेत.

नमिता म्हात्रे 'अ‍ॅक्टिव्ह'

नमिता म्हात्रे या प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसल्या तरी स्त्रीयांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्या देखील समाजकार्यत सक्रिय असतात.पदवीधर असलेल्या नमिता म्हात्रे गेली २८ वर्षे विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. हळदी-कुंकू, मंगळागौर, लग्नकार्ये, वाढदिवसांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. महिलांना देवदर्शन घडवून आणणे अथवा आरोग्य शिबिरांमध्ये त्यांची धावपळ असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT