Ajit Pawar: पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूककोंडीचा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फटका; कोल्हापूरऐवजी कऱ्हाडमध्ये घडला मुक्काम

कोल्हापूरचा नियोजित मुक्काम रद्द करून त्यांना कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला.
ajit pawar
ajit pawar sarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा रविवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामना करावा लागला. कऱ्हाड शहराजवळून जाणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावर रविवारी सायंकाळपासून पाच तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हसवड (जि. सातारा) येथील कार्यक्रम आटोपून कोल्हापूर येथील कार्यक्रमाला मोटारीतून निघालेल्या उपमुख्यमंत्री पवारांनी काही काळ वाट पाहून कोल्हापूरचा नियोजित मुक्काम रद्द करून त्यांना कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला.

ajit pawar
Hake Warning to Jarange: जरांगेचे मुंबई येण्यापूर्वीच विसर्जन करू! हाकेंनी दिला इशारा

कऱ्हाड, मलकापूर, जखिणवाडी, नांदलापूर परिसरात पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्या मुळे या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीचा महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मलकापूरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळांची मिरवणूक महामार्गावरून रविवारी दुपारी चारच्या सुमारास मलकापूरपर्यत नेहण्यात येत होती. गणेश आगमनाची ही मिरवणूक रात्री दहापर्यत सुरू होती.

ajit pawar
100 Years of RSS: संघ भविष्यात कुठल्या कार्यात लावणार शक्ती? दिल्लीत होणार मंथन; रंजन गोगोई, कैलाश सत्यार्थी, कपिल देव लावणार हजेरी

मिरवणुकीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन ट्रॅफिक जाम झाले. याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हसवड येथील कार्यक्रम संपवून कोल्हापूरला निघाले होते. मात्र, महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्यांचा ताफा महामार्गावरच अडकून पडला. उपमुख्यमंत्री पवार यांनी थोडा वेळ वाट पाहून त्यांचा कोल्हापूरमधील नियोजीत मुक्काम रद्द केला. त्यांनी कऱ्हाडचे शासकीय विश्रामगृह गाठले आणि त्याच ठिकाणी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी आज पहाटे सहाच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार हे मोटारीने नियोजीत दौऱ्यासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले.

ajit pawar
Smriti Irani: मोदींपाठोपाठ स्मृती इराणींच्याही पदव्या तपासण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती; CICला फटकारताना म्हटलं...

नियोजित दौरा नसतानाही अधिकाऱ्यांना त्रास का दिला?

वाहतूक कोंडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला. त्याचा काही प्रमुख अधिकाऱ्यांनाच माहिती होती. आज सकाळी याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पोलिस कर्मचारी, सादिक इनामदार उपस्थित होते. नियोजित दौरा नसताना सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना बघून अजित पवार यांनी नियोजित दौरा नसतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांना का त्रास दिला, असे म्हणत प्रोटोकॉलनुसार गरज आहे, तेवढेच अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com