Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर आमदार प्रकाश फातर्फेकरांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार प्रकाश फातर्फेकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यावर फातर्फेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावर प्रकाश फातर्फेकर यांनी फेसबूक पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये फातर्फेकर म्हणाले ''खोट्या बातम्या पसरवणे बंद करावे! मी कधीही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार नाही. आज सकाळी विभागातील स्थानिक शासकीय महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला भेट देऊन महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सक्रिय उपस्थित राहिलो. प्रसारमाध्यमांसाठी महामोर्च्यातील व्यासपीठावरील छायाचित्रे जोडल्या आहेत. #TRP साठी प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे खोट्या बातम्या पसरवणे आधी बंद करावे. जय हिंद जय महाराष्ट्र!'' असे फातर्फेकर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये महाविकास आघाडीने मोहा मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये महापुरूषांचा अवमान, राज्यातील प्रकल्प, शेतकरी, बेरोजगारी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा विविध मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) यांच्यासह अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

एकीकडे आघाडीचा महामोर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईत मोठे खिंडार पडल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. महामोर्चात सहभागी न होता ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत एका स्थानिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, यावर फातर्फेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT